Tarun Bharat

हन्नूर रस्त्यावर दोघा चंदन तस्करांना रंगेहाथ पकडले

२ लाख ३४ हजाराच्या मुद्देमालासह दोघे अटक असून एक दिवस पोलीस कोठडी

Advertisements


प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर ते इटकळ रस्त्यावर हन्नूर नजीक चंदन विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना सायंकाळी ७ च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दि २२ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे. व त्यांना एक दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि २१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी विजय शिवाजी फसके वय ४० व गणेश शिवाजी घोडके वय ३५ दोघेही रा. मालेगाव ता बार्शी जि सोलापूर हे एक लाख ५४ हजार किंमतीचे २२ किलो वजनाचे सुगंधी चंदनाची लाकडे व इतर साहित्य आणि मोटारसायकलसह एकूण २ लाख ३४ हजार ८०० रुपये किंमतीचे मुद्देमालासह नितीन उर्फ बुभा राऊत रा. सर्जापूर ता बार्शी यास विक्री करण्यासाठी जात असताना इटकळ ते हन्नूर रोडवर हन्नूर नजीक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून संबंधित आरोपी विजय शिवाजी फसके व गणेश शिवाजी घोडके दोघेही रा. मालेगाव ता बार्शी यांना ताब्यात घेतले असून यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे व दोन्ही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडेकर, ए एस आय ख्वाजा मुजावर ,हवालदार गोलेकर,हवालदार मंथावले, चालक समीर शेख यांनी केली.या घटनेची फिर्याद पो हे कॉ धनाजी गाडे यांनी दिली तर पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडेकर हे करीत आहेत.

Related Stories

सोलापूर शहरात 36 कोरोना पॉझिटिव्ह तर 32 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

महाविकास आघाडी सरकार हे विद्यार्थ्यांना न्याय देणार – अॅड. पुजा झोळे

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये ६६३ कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांची शेतकऱ्यांशी ऊसाच्या अतिरीक्त प्रश्नावर चर्चा

Sumit Tambekar

नळी येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde

मठाधिपतीपदाच्या वादात पिसाळ महाराजांची हत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!