Tarun Bharat

हयात प्रमाणपत्रांसाठी पोस्ट विभाग ठरतोय सोयीचा

850 पेन्शनधारकांनी काढले प्रमाणपत्र

प्रतिनिधी/ बेळगाव

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ग्राहकांच्या हिताच्या व सोयीस्कर ठरतील अशा योजना सुरू केल्यामुळे अल्पावधीतच ही बँक लोकप्रिय ठरू लागली आहे. या बँकेने सुरू केलेल्या जीवन प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) योजनेलाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. वयोवृद्ध सरकारी निवृत्त कर्मचाऱयांना ही योजना सोयीची ठरत आहे. मागील महिन्याभराच्या कालावधीत बेळगाव विभागात 850 निवृत्त कर्मचाऱयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. वयोवृद्ध कर्मचाऱयांना घरबसल्या जीवन प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे.

सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱयांना पेन्शनचा आधार असतो. यासाठी वर्षातून एकदा हयात प्रमाणपत्र द्यावे लागते. नोक्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र जमा करावे लागते. परंतु यावषी कोरोना असल्यामुळे ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. वृद्धांना कोरोनामुळे बाहेर पडणेही अशक्मय होते. त्यामुळे यावर पोस्ट विभागाने तोडगा काढून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून पेन्शनधारकांच्या घरापर्यंत पोहचून त्यांचे हयात प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात केली.

घरोघरी जावून काढले हयात प्रमाणपत्र

पोस्ट विभागाने प्रत्येक पोस्टमन व ग्रामीण डाक सेवकांना मोबाईल दिला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांच्या घरी जावून हयात प्रमाणपत्र देणे सोयीचे ठरत आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आधारकार्ड, मोबाईल क्रमांक व पीपीओ क्रमांक देणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील पोस्टमन तसेच ग्रामीण डाक सेवकाला घरी बोलावून हयात प्रमाणपत्र काढले जात आहे.

मुख्य पोस्ट कार्यालयात एक काऊंटर ज्यांना पोस्ट कार्यालयात येणे शक्मय आहे, अशा व्यक्तींसाठी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात एक काऊंटर सुरू करण्यात आले आहे. या काऊंटरच्या माध्यमातून वयोवृद्ध पेन्शनधारकांना हयात प्रमाणपत्र काढून देण्यात येत आहे. स्वतंत्र काऊंटर उघडल्याने पेन्शनधारकांनाही ते सोयीचे ठरू लागले आहे.

Related Stories

खानापुरात विविध संघटनांतर्फे शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

विजयनगरजवळ मुख्य जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

रिंगरोडविरोधात मोर्चा काढणारच!

Amit Kulkarni

पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे हटविण्याची मागणी

Amit Kulkarni

कर्नाटक: माजी मंत्री जनार्दन पुजारी यांची कोरोनावर मात

Archana Banage

बेळगाव जिल्ह्यात गुरूवारी 161 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Tousif Mujawar