Tarun Bharat

हरभजन सिंग, जावगल श्रीनाथ यांना एमसीसीचे आजीवन सदस्यत्व

वृत्त संस्था/ लंडन

इंग्लंडमधील लॉर्डस् मैदानाच्या प्रांगणात असलेल्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि जावगल श्रीनाथ यांना आजीवन सदस्यत्व बहाल करून त्यांचा गौरव केला.

लॉर्डस्च्या परिसरात स्थायिक असलेले एमसीसी क्लब म्हणजे क्रिकेट नियमांचे कस्टडियन म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रामध्ये हरभजन सिंग आणि जवागल श्रीनाथ यांची कामगिरी दर्जेदार झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळविणाऱया गोंलंदाजीच्या यादीत तिसरे स्थान मिळविणाऱया हरभजन सिंगने 103 कसोटीत 417 बळी नोंदविले आहेत. तसेच त्याने क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये 700 पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.

भारताचा माजी जलद गोलंदाज जावगल श्रीनाथने वनडे क्रिकेटमध्ये 315 तर कसोटीमध्ये 236 बळी नोंदविले आहेत. एमसीसीतर्फे इंग्लंडचे माजी कसोटीवीर ऍलिस्टर कूक, इयान बेल आणि ट्रस्कोथिक यांनाही आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. इंग्लंडच्या या तीन क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्रित 39 हजार पेक्षा अधिक धावा नोंदविल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला, हर्षल गिब्ज, कॅलिस आणि मॉर्कल यांनाही एमसीसीचे आजीवन सदस्यत्व देण्यात आले आहे. महिला क्रिकेटपटू ऍलेक्स ब्लॅकवेल आणि डॅमियन मार्टिन या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनाही सन्मानित केले गेले.

Related Stories

पाक महिला संघाची विजयी सलामी

Patil_p

हरियाणा संघाला महिला हॉकीचे जेतेपद

Patil_p

बेंगळूर एफसीचा ईगल्सवर निसटता विजय

Patil_p

रामकुमार रामनाथन विजेता

Patil_p

गुजरात-लखनौमध्ये उद्या काट्याची टक्कर

datta jadhav

एकाच दिवसात भारताला 2 सुवर्णपदके

Patil_p