Tarun Bharat

हरभरा चाट

साहित्य : 2 वाटी सोललेला ताजा हरभरा, चिमुटभर बेकिंग सोडा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा अथवा चवीपुरते काळं मीठ, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, पाव चमचा काळीमिरी पावडर, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा अथवा आपल्या स्वादानुसार लिंबूरस

कृती : सोललेला हरभरा पाण्यातून काढावा. पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करण्यास ठेवावे. उकळी आली की त्यात बेकिंग सोडा टाकावा. नंतर त्यात हरभरा घालून दोन मिनिटे वाफवून घ्यावे. आता आच बंद करून हरभरा चाळणीत काढावेत. वरून त्यावर गार पाणी ओतून बाजूला ठेवावे. गरम तेलात मोहरी टाकून तडतडावी. नंतर त्यात हिंग आणि हरभरा घालून मिश्रण मिक्स करावे. वरून हिरवी मिरची, काळीमिरी पावडर आणि मीठ टाकून मिश्रण मधे मधे मिक्स करीत दोन मिनिटे शिजवून घ्यावे. आता तयार चाट खाण्यास देण्यापूर्वी त्यावर लिंबूरस आणि कोथिंबीर टाकून खाण्यास द्या.

Related Stories

घरच्या मसाल्यांनी बनवा चविष्ट वांगी भात

Kalyani Amanagi

रागी क्रॅकर्स

tarunbharat

डाळ मसाला वडा

Omkar B

चिकन पॉपकॉर्न

tarunbharat

पटकन होणारी खुसखुशीत रवा चकली

Kalyani Amanagi

चटपटीत ऑलिव्ह सॅलड

Amit Kulkarni
error: Content is protected !!