Tarun Bharat

हरमल किनाऱयावर काळय़ा रंगाचे तेलगोळे

Advertisements

वार्ताहर /हरमल

येथील किनारी भागात सध्या डांबरसदृश्य काळय़ा तेल गोळे निर्माण झाले आहेत. यामुळे किनारपट्टी परिसर विद्रुप बनला असून, गणपती विसर्जन करताना भाविकांना याचा त्रास होऊ शकतो. या प्रकाराविषयी समाजिक कार्यकर्ते लुडू रामजी यांनी संताप व्यक्त केला.

 रविवारी सकाळी नागरिक नेहमीप्रमाणे व्यायामासाठी किनाऱयावर गेले असता, त्यांना काळे तेलगोळे दृष्टीस पडले. समुद्राचे पाणी ते दहा-पंधरा मीटरचा भाग पूर्णपणे काळय़ा डांबरसदृष्य तेलकट पदार्थाने व्यापला होता. दोन महिन्यांपूर्वी अशीच स्थिती हरमल ते मांदे किनारी भागांत निर्माण झाली होती व त्यावेळेस अनेकदा लक्ष वेधून घेतले होते. सदर काळय़ा पदार्थाची पाहणी केली असता, त्यात चिकट पदार्थ दिसून आला, असे समाजकार्यकर्ते लुडू रामजी यांनी सांगितले.

कित्येक भागांत डांबर सदृष्य स्थितीमुळे चालणे मुश्कलि झाले होते.पायातील पादत्राणे व बूट आदींचे तळवे डांबराने चिकटले होते व त्यात वाळूचे थर दाटल्याने चालणे कठीण झाले होते. अलीकडच्या काळात बऱयाचवेळा किनारी भागांत पाण्यावर तरगंणारा तेल तवंग दृष्टीस पडतो.

 या प्रकाराची संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. समुद्रातुन तेल गोळे वाहून येणे धोकादायक असून समुद्रातील जलचर, मासळी आदींची अपरिमित हानी, पाण्याचे प्रदूषण व आरोग्याबाबत गंभीर रोग उद्भवण्याची शक्मयता आहे, त्यामुळे यावर गांभीर्याने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मत रामजी यांनी व्यक्त केले.

Related Stories

सामुदायिक शेतीचे 10 प्रस्ताव मंजूर

Patil_p

कुडचडे पालिकेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Omkar B

साळगावात ज्येष्ठ कार्यकर्त्यालाच तिकीट मिळेल

Amit Kulkarni

ज्ञान, प्रेम यांचा पूरक समतोल आवश्यक : मुकेश थळी

Amit Kulkarni

चाले खेळ उन – पावसाचा!

Omkar B

सावईवेरेत लईराईच्या धोंडगणांची 77 वर्षांची व्रत परंपरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!