Tarun Bharat

हरयाणात 30 जून पर्यंत च्युईंगम विक्रीवर बंदी 

Advertisements

ऑनलाइन टीम / हरयाणा :

जगभरात थैमान घालत असलेला कोरोना‌ व्हायरस भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. शिंकल्याने, थुंकल्याने होणारा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हरयाणा सरकार ने 30 जून पर्यंत च्युईंगम विक्री वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

हरयाणाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कोरोना‌ग्रस्त शिंकला, थुंकला तर त्याच्या मुळे निरोगी माणसाला देखील कोरोना ची लागण होऊ शकते तसेच कोरोना‌ग्रस्ताने चघळलेले च्युईंगम थुंकले तर त्यातूनही कोरोना ची लागण होऊ शकते. त्यामुळे च्युईंगम विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 

त्याचबरोबर पान गुटखा विक्रीवर घालण्यात आलेली बंदी अजून कठोरतेने राबवण्यात येणार आहे. असे ही प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये च पानमसाला, गुटखा विक्रीवर हरयाणा सरकारने बंदी घातली आहे. 

Related Stories

मराठा आरक्षणप्रश्नी 6 जून पर्यंतचा अल्टिमेटम; संभाजीराजे आक्रमक

Abhijeet Shinde

भारत – चीन ‘एलओसी’वर गोळीबार

Patil_p

आसामच्या मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी चर्चा

Patil_p

पंजाबमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल १०० विद्यार्थी कोरोना बाधित

Sumit Tambekar

आशेचा किरण ग्लासगो परिषद

Patil_p

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका ; याचिका फेटाळली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!