Tarun Bharat

हरिपूर येथे आरटीओ एजंटचा खून; पत्नी गंभीर जखमी

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

मिरज तालुक्यातील हरिपूर येथील आरटीओ एजंट सुरेश नांद्रेकर वय ४७ याचा तिघांनी खून केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. हल्लेखोरांनी सुरेश यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही हल्ला चढविला त्यामध्ये पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीजवळ हा प्रकार घडला. सांगली ग्रामीण पोलीस याचा तपास करत आहेत.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश ‘नांद्रेकर आणि त्याच्या पत्नी संकष्टी सोडण्यापुर्वी बागेतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. दर्शन घेवून घरी परत येत असताना त्यांच्या घराच्या ५० फुटाच्या अलिकडेच तिघे हल्लेखोर दबा धरून बसले होते. या तिघा हल्लेखोरांनी शॉकप्सरने सुरेश यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही या हल्लेखोरांनी हल्ला केला.

या हल्ल्यानंतर हे तिघे हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ या जखमी पती पत्नीला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी पहाटे सुरेश नांद्रेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

Related Stories

फातोर्डात 10 उमेदवारांची माघार, ‘फातोर्डा फॉरवर्ड’ पॅनलला पाठिंबा

Patil_p

‘स्वच्छ भारत, फिट इंडिया’ हे ध्येय साध्य करणार !

Patil_p

महाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ (3)

Patil_p

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी विद्यादेवी पोळ रूजू

Abhijeet Shinde

लग्न समारंभाला 50 पेक्षा अधिक उपस्थित राहील्यास फौजदारी

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : शिवसेनेच्यावतीने चीनचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!