Tarun Bharat

हरिपूर रस्त्यावरील लोखंडी पुलाला रेलिंग लावा

सामाजिक कार्यकर्ते शरद फडके यांची मागणी

Advertisements

सांगली/प्रतिनिधी

हरिपूर रस्त्यावर लोखंडी पूल नावाने ओळखला जाणारा पूल आहे. साधारण १० वर्षापूर्वी याचे रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरण करताना पुलाच्या कडेच्या साईड पट्या अशाच रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. त्या आता धोकादायक होऊ लागल्या आहेत. या लोखंडी पुलाला रेलिंग लावण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद फडके यांनी केली आहे.

या पुलाच्या २० फुटाखाली ओढा वाहत असून, जर साईड पट्टी वरून एखादा माणूस, जनावर अनावधाने घसरले तर सरळ त्या ओढ्यात पडेल. तेथेच झालेले नवीन सिमेंटचे गटार, झाडेझुडपे याला अडकून दुर्घटना घडण्याचीही दाट शक्यता आहे. तरी संबंधित नगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांनी याची पहाणी करून या ठिकाणी लोखंडी रेलिंग किवा पाच फुटी भिंत बांधून या साईड पट्टीचा भाग सुरक्षित करावा, अशी विनंती फडके यांनी केली आहे. 

Related Stories

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, पणनमंत्र्यांचे आदेश

Abhijeet Shinde

सांगली : आघाडी एकसंघ, भाजप गॅसवर!

Abhijeet Shinde

सांगली : मुख्य बाजार पेठेतील १०० अतिक्रमणावर हातोडा

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन, काय सुरु/बंद पहा

Abhijeet Shinde

खटावमध्ये भराव ढासळून रस्ता तुटला

Abhijeet Shinde

सांगली : पेठमधील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!