Tarun Bharat

हरिप्रिया एक्स्प्रेस धावली इलेक्ट्रिक इंजिनवर

5 हजार लिटर डिझेलची होणार बचत

प्रतिनिधी /बेळगाव

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल ते तिरुपतीदरम्यान धावणारी हरिप्रिया एक्स्प्रेस आता इलेक्ट्रिक इंजिनवर धावू लागली आहे. हुबळी ते गुंडकल या मार्गावर ती इलेक्ट्रिक इंजिनवर धावत आहे. यामुळे डिझेलची बचत होऊ लागली आहे. 4 एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर सुरू करण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतला आहे.

महत्त्वाच्या सर्वच मार्गांचे विद्युतीकरण केले आहे. त्यामुळे ज्या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे त्या मार्गांवर इलेक्ट्रिक इंजिनद्वारे एक्स्प्रेस धावू लागल्या आहेत. हरिप्रिया एक्स्पेससोबतच हुबळी-चेन्नई सेंट्रल ही एक्स्प्रेसही इलेक्ट्रिक इंजिनवर धावत आहे.

हरिप्रिया एक्स्प्रेस कोल्हापूर ते तिरुपती अशी एकूण 900 कि. मी. धावते. यापैकी 574 कि. मी. मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनद्वारे ही रेल्वे धावत आहे. एकूण 64 टक्के मार्गावर रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असून उर्वरित मार्गांवर लवकरच धावणार आहे. अद्याप मिरज ते हुबळी या दरम्यानच्या काही भागाचे विद्युतीकरण अद्याप पूर्ण न झाल्याने लवकरच हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्युतीकरण झाल्यास कोल्हापूर, मिरज, बेळगाव, हुबळी या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

रोज 5 हजार लिटर डिझेलची बचत

आतापर्यंत सर्व रेल्वे डिझेलवर धावत होत्या. परंतु यासाठी मोठय़ा प्रमाणात डिझेलची गरज भासत होती. मागील 2 वर्षात 48 एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर धावत आहेत. तर 2021-22 या आर्थिक वर्षात 26 एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर धावू लागल्या. त्यात आता नव्याने चार एक्स्पेसचा समावेश केला आहे. यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेची रोज 5 हजार लिटर डिझेलची बचत होणार आहे.

Related Stories

जनताच करणार कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षांची निवड

Patil_p

मच्छे नवभारत सोसायटीची सभा खेळीमेळीत

Omkar B

माणुसकीच्या दृष्टीने तरी कोरोनाग्रस्तांना मदत करा

Amit Kulkarni

जखमी घोडय़ाची गो-शाळेत रवानगी

Amit Kulkarni

शहराच्या प्रवेश मार्गांवर कचऱयांचे ढिग

Amit Kulkarni

क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालय स्थलांतर रखडले

Amit Kulkarni