Tarun Bharat

हरियाणातील 19 जिल्ह्यात 514 नवे कोरोना रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / हरियाणा : 


हरियाणा राज्यातील 19 जिल्ह्यात सोमवारी 514 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 562 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच हरियाणातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 722 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात झालेल्या 12 मृत्यूंमुळे एकूण बळींची संख्या 100 वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून 46.17 टक्के तर रुग्ण वाढण्याचे प्रमाण 4.19 टक्के आहे. तसेच आतापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. एकूण 7722 रुग्णांमधील 5293 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2429 महिला आहेत. 


दरम्यान, सोमवारी आढळलेल्या 514 रुग्णांपैकी गुरुग्राममध्ये सर्वाधिक 183, फरिदाबाद मध्ये 128, सोनपतमध्ये 63, झज्जर 9, नूह 2, अंबाला 4, पानिपत 3, पंचकुला 1,  जिंद 2, करनाल 18, सिसौरा 5, फतेहाबाद 10, भिवानी 20, रोहतक 21, महेंद्रगड 13, हिसार 8, रेवाडी 18,  कैथल 2 आणि कुरुक्षेत्र मधील 4 रुग्णांचा समावेश आहे. 

Related Stories

मुंबई हल्ल्यामुळे मनमोहन सरकार होते भयभीत

Patil_p

राम मंदीराचे निर्माण पूर्ण होण्याचा समय सुनिश्चित

Patil_p

Kamal Hasan : चोल काळात हिंदू धर्म नव्हता : कमल हसन यांचा वेत्रीमारन यांना पाठिंबा

Abhijeet Khandekar

कोरोना : महाराष्ट्रात 3,451 नवे रुग्ण; तर 35,633 ॲक्टिव्ह रुग्ण

Tousif Mujawar

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल – परराष्ट्र मंत्री जयशंकर

Archana Banage

अयोध्या : राममंदिरासाठी 2 हजार कोटींचे दान

datta jadhav
error: Content is protected !!