ऑनलाईन टीम / हरियाणा :
हरियाणामध्ये मागील चोवीस तासात कोरोनाच्या 694 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 26 हजार 858 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संसर्गाचे प्रमाण 5. 96 टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 75.31 टक्के इतके आहे.


काल आढळलेल्या 694 रुग्णांमध्ये गुरग्राममध्ये 109, फरिदाबादमध्ये 103, सोनपतमध्ये 98, रोहतक 15, भिवानी 8, रेवारी 75, करनाल 21, अंबाला 70, झज्जर 24, पलवल 35 , नूह 3, महेंद्रगड 20, हिसार 23, पानिपत 35, कुरुक्षेत्र 5, सिरसामधील 8, जींद 5, फतेहाबाद 14, पंचकुला 13, कैथल 5 आणि चरखी दार्दीमधील 5 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत 20 हजार 226 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 6277 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 355 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये 260 पुरुष व 95 महिलांचा समावेश आहे.