Tarun Bharat

‘हरियाणा फ्रेश’ नावाने बॉटल बंद पाणी तयार करणार सरकार

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


हरियाणा सरकारकडून आता हरियाणा फ्रेश नावाने बॉटल बंद पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी यंत्रणेची स्थापना केली जात आहे. याची जबाबदारी सरकारने पब्लिक हेल्थ विभागाला दिली आहे. या बरोबरच महाग्राम योजनेअंतर्गत पाहिल्या ग्रामीण सिवरेज प्रणालीचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी फरिदाबादमधील ग्राम सोताईमध्ये केले जाणार आहे. 


मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या अध्यक्षतेत जन स्वास्थ्य विभागच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या सयंत्रणेच्या स्थापनेसाठी विविध उपाय योजना आणि साधनांबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. सुरुवातीला हे बॉटल बंद पाणी सरकारी संस्थांना उपलब्ध करुन दिले जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये मिनरल वॉटर रीवर्स ऑस्मोसिस (आरओ) सयंत्रची स्थापन केली जाणार आहे. 


या बैठकीत अजून एक निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, पिण्याच्या पाण्याबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक व्यापारी परीक्षण प्रयोगशाळेची देखील स्थापना करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेत पिण्याचे पाणी तसेच अन्य खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची देखील तपासणी केली जाणार आहे. लोकांना स्वच्छ पाणी आणि भरपूर पाणी उपलब्ध करून देणे, हीच राज्य सरकारची मुख्य प्राथमिकता आहे, असे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

भुजबळांची 100 कोटींची संपत्ती जप्त; सोमय्यांचा दावा

datta jadhav

निर्मला सीतारमण यांच्या ट्वीटवर निशाणा साधत अशोक चव्हाण म्हणाले…

Archana Banage

देशातील रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांवर

Patil_p

चीनला डावलून अमेरिकेसोबत गेलात तर…

datta jadhav

धक्कादायक!बनावट दागिने देऊन राष्ट्रीय बँकेसह पतसंस्थेचे फसवणूक

Rahul Gadkar

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का

Patil_p