Tarun Bharat

हरियाणा शासनातर्फे ‘खेलो इंडिया’ टॉर्च रिले आयोजित

वृत्तसंस्था/ पंचकुला

2021 च्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाने पटकाविले आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच टॉर्च रिले (क्रीडा ज्योत दौड) आयोजित केली असून हरियाणा शासनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे तसेच खेलो इंडिया स्पर्धेच्या जागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

पंचकुलापासून या स्पर्धेच्या टॉर्च रिलेला प्रारंभ झाला असून ही क्रीडाज्योत विविध ठिकाणचा प्रवास करत देवीलाल स्टेडियममध्ये होणाऱया या स्पर्धेच्या भव्य उद्घाटन समारंभावेळी दाखल होईल. हरियाणातील विविध क्रीडा क्षेत्रातील क्रीडापटू तसेच प्रमुख पाहुणे या टॉर्च रिलेमध्ये आपला सहभाग दर्शवित आहेत.

Related Stories

‘आय ऍम बॅडमिंटन’ मोहिमेची पीव्ही सिंधू ‘ऍम्बॅसेडर’

Patil_p

भारतीय महिला फुटबॉल संघाचा ब्राझीलविरुद्ध सामना

Patil_p

नवोदित मल्लांनी महाराष्ट्राचे नाव देशाबाहेरही उज्वल करावे – राहुल आवारे

Archana Banage

लडाखची मक्सूमा विराटची चाहती

Patil_p

किंग्स इलेव्हन पंजाब संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

tarunbharat

बिग बॅश स्पर्धेत बेअरस्टोचे पदार्पण

Patil_p