Tarun Bharat

हरियाणा : सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड, सोबत देणार 5 मास्क

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


हरियाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये सार्वजनिक भागात मास्क न घालणाऱ्या नागरिकांना 500 रुपयांचा दंड केला जाणार आहे. तसेच संबधित नागरिकांना 5 मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. 


मिळाल्या माहितीनुसार हे मास्क महिला बचत गटांकडून विकत घेतले जाणार आहेत. या संदर्भात शहरी स्थानिक निकाय निदेशालयाने प्रदेशातील ऑफिसर्सना  आदेश दिले आहेत. तसेच घरातून बाहेर पडताना सर्वांना मास्क घालून बाहेर करणे बंधनकारक केले आहे. 


गुलहा नगर निकायचे सचिव राजेश कुमार यांनी सांगितले की, हरियाणा शहरी स्थानिक निकायच्या अंतर्गत नगरपालिका, नगरपरिषद आणि नगर निगमचा स्टाफ दररोज बाजार आणि सार्वजनिक ठिकाणी टीम करून दंड आकारण्याचे कार्य करत आहेत. 


या अंतर्गत जे लोक मास्क घालणार नाहीत त्यांना 500 रुपयांचा दंड आणि 5 मास्क दिले जाणार आहेत. तसेच त्यांना मास्क घालण्याबाबत जागृती करणार आहेत. 

Related Stories

पंतप्रधान मोदींनी 5 वर्षात केले 58 देशांचे दौरे; 517.82 कोटी खर्च

datta jadhav

शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

पंजाबमध्ये निवडणूक, प्राप्तिकर विभाग सतर्क

Patil_p

मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवाला धोका, सुरक्षा वाढवली

datta jadhav

…तर भारतात दिवसाला 14 लाख कोरोना रुग्ण आढळतील

datta jadhav

चिंताजनक : दिल्लीत 8,593 नवे कोरोना रुग्ण; 85 मृत्यू

Tousif Mujawar