Tarun Bharat

हरुन ग्लोबलच्या यादीत अंबानींची झेप

Advertisements

यादीत रिलायन्सच्या अंबानींपाठोपाठ हिंदुजा बंधुंची वर्णी  

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशासह जगामध्ये आज आर्थिक मंदीचे सावट असतानाही 2019 च्या वर्षात भारतात प्रति महिन्याला तीन नवीन अब्जाधीश निर्माण झाले आहेत. यांच्यासह एकूण मिळून अब्जाधीशांची संख्याही 138 झाली आहे. हा आकडा चीन आणि अमेरिकेनंतर सर्वाधिक असल्याची नोंद केली आहे. यामध्ये सध्या हरुन ग्लोबल रिच 2020 ने आपली यादी नुकतीच सादर केली आहे. सदर यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणून नोंद करण्यात आली आहे.

एकूण 6,58,400 कोटी रुपयांच्या खासगी संपत्तीसोबत ते जगातील पाचवे स्थान मिळवणारे पहिले भारतीय श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांनी प्रती तासाला 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती हरुनच्या यादीतून समोर आली आहे. सदरच्या यादीत 828 भारतीयांना स्थान मिळाले आहे. लंडन येथे वास्तव्यास असणारे हिंदुजा बंधू एकूण 1,43,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत दुसऱया स्थानी तर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर 1,41,700 कोटी रुपयांसह तिसऱया नंबरवर असून गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब हे चौथ्या नंबरवर राहिले आहेत.

चीनचे वर्चस्व

हरुन ग्लोबल रिच यादीत 799 अब्जाधीशांच्या संख्येच्या जोरावर चीन सर्वोच्च स्थानी राहिले असून दुसऱया स्थानी अमेरिका 626 अब्जाधीशांसह राहिली आहे.

Related Stories

31 डिसेंबरनंतरही करता येणार पीएफ ई-नॉमिनी

Amit Kulkarni

ट्वीटर महसूल वाढविणार

Patil_p

जूनमध्ये रेपोदरामध्ये वाढीची शक्यता

Patil_p

…अखेर वाहन उत्पादनावर परिणाम सुरू

Patil_p

रुची सोया झाली कर्जमुक्त

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये पुन्हा परतली तेजी

Patil_p
error: Content is protected !!