Tarun Bharat

हर हर महादेव च्या टीझरसाठी राज ठाकरे यांचा दमदार आवाज

Advertisements

मुंबई प्रतिनिधी

मराठी चित्रपट सृष्टीत एकापाठोपाठ एक ऐतिहासिक चित्रपट येत आहे. सध्या ‘हरहर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. पण या टीझर मुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत.कारण त्यांनी या चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिला आहे.

या व्हिडीओमधील राज ठाकरे यांच्या दमदार आवाजानं सर्वांची मनं जिंकली आहेत.“जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव,” ही राज ठाकरेंच्या आवाजातील वाक्यं ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक अभिजित देशपांडे असून यावर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

गौरी खानने लेकीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Patil_p

मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी – नाना पटोले

Abhijeet Shinde

धक्कादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 9518 कोरोना रुग्ण; 258 मृत्यू

Rohan_P

SBI कडून व्याजदरात कपात

datta jadhav

बारावीचा निकाल उद्या

datta jadhav

… नाहीतर 2024 मध्ये शिवसेनेचे मोठे नुकसान होणार : रामदास आठवले

Rohan_P
error: Content is protected !!