Tarun Bharat

हलगा ग्रा. पं. अध्यक्षपदी गणपत मारिहाळकर

Advertisements

हलगा : हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी गणपत मारिहाळकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी रुपा सुतार या अविरोध निवडून आल्या आहेत. बुधवार दि. 3 रोजी ही निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्या वैशाली तुडवेकर होत्या. हलगा ग्राम पंचायतमध्ये 18 सदस्य संख्या असून अध्यक्षपदासाठी सामान्य व उपाध्यक्षपदासाठी अ वर्ग महिला आरक्षण आले होते. अध्यक्षपदासाठी चार जणांनी अर्ज केले होते. यामधून दोघांनी माघार घेतल्यामुळे गणपत मारिहाळकर व तवनाप्पा पायक्का यांच्यामध्ये निवडणूक झाली. यामध्ये गणपत मारिहाळकर यांना 12 मते पडली तर तवनाप्पा पायक्का यांना 6 मते पडली. यामुळे गणपत मारिहाळकर यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी दोन सदस्यांनी अर्ज केले होते. यामधून एका सदस्याने अर्ज माघार घेतल्यामुळे रुपा सुतार या अविरोध निवडून आल्या आहेत.

निकाल जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्मयांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. गणपत मारिहाळकर व रुपा सुतार यांना भगवा फेटा बांधून पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी कल्याणी चौगुले याही उपस्थित होत्या.

Related Stories

सिद्धरामय्या यांच्याकडून महिलांचा अवमान

Amit Kulkarni

विष्णू गल्ली, वडगाव येथे आर्सेनिक अल्बम-30 गोळय़ांचे वाटप

Patil_p

बेळगाव जिल्हयात गुरुवारी 161 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे आता पर्यंत १६ जणांचा मृत्यू

Archana Banage

‘स्वीटकॉर्न’शेतकऱयांना ठरतेय फायदेशीर

Omkar B

हुबळी स्पोर्ट्स क्लब अ, अमृत पोतदार सीसीए संघ विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!