Tarun Bharat

हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न

Advertisements

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

हलगा-मच्छे बायपासविरोधात शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी न्यायालयाने रस्ताकामास स्थगिती दिली आहे. असे असताना सोमवारी पुन्हा रस्त्याचे कामकाज करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून सुरू होता. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असून आता त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. काम सुरू असल्याचे निदर्शनास येताच शेतकऱयांनी घटनास्थळी जाऊन जाब विचारला. त्यानंतर काहीवेळ काम थांबविण्यात आले होते.

हलगा-मच्छे बायपास हा रस्ता सुपीक जमिनीतून होत आहे. त्या रस्त्याला पहिल्यापासूनच शेतकऱयांनी जोरदार विरोध केला आहे. रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई सुरू आहे. तरीदेखील दडपशाही करत रस्त्याचे काम अनेकवेळा सुरू करण्यात आले होते. न्यायालयाने हा रस्ता करू नये, असा आदेश दिला आहे. असे असतानादेखील रस्त्याचे कामकाज सुरूच ठेवण्यात आले आहे.

मच्छे येथून रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात आले. उभ्या पिकामध्ये जेसीबी चालवून पिकांचे नुकसान करण्यात आले. शेतकऱयांनी यावेळी तीव्र विरोध केला. तरीदेखील काम सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे पुन्हा बेळगाव येथील दिवाणी न्यायालयात रस्त्याविरोधात स्थगिती मिळविण्यात आली. न्यायालयाने हा रस्ता करू नये, असे सांगितले आहे. असे असताना पुन्हा कंत्राटदार रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

‘लक्ष्य व्हिजन 2040’ उपक्रमाचे उद्घाटन

Amit Kulkarni

कारवार जिल्हय़ात शनिवारी 164 कोरोनाबाधित

Patil_p

अपघातात धामणेचा तरुण जखमी

Omkar B

खानापूर तालुक्यातील ब्रिटिशकालीन महसूल विभागांची पुनर्रचना आवश्यक

Amit Kulkarni

कुद्रेमनी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

दिवसभर शांत…सायंकाळी गर्दी

Patil_p
error: Content is protected !!