Tarun Bharat

हलगा येथे युवकांकडून स्मशानभूमीची स्वच्छता

Advertisements

वार्ताहर /हलगा

लक्ष्मी गल्ली, हलगा येथील धर्मवीर संभाजी चौक येथील युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी स्मशानभूमीची स्वच्छता केली. स्मशानभूमीत अस्वच्छता पसरल्याने युवकांनी हा उपक्रम राबविला. केवळ स्वच्छता करून न थांबता पुढील काही दिवसात या परिसरात झाडे लावण्याचा उपक्रमही हे युवक राबविणार आहेत. स्मशानभूमीत पडलेले प्लास्टिक, कपडे, अर्धवट जळालेली लाकडे एकत्र करून स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली. युवकांनी केलेल्या या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे. मंडळाचे अध्यक्ष जोतिबा मोरे, आकाश बाळेकुंद्री, प्रकाश मास्तमर्डी, नागराज बाळेकुंद्री, युवराज पुनाजी, आनंद पुनाजी, सौरभ बिळगोजी, राजू पुनाजी, प्रदीप बिळगोजी यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Stories

कुद्रेमनी येथे आज मराठी साहित्य संमेलन

Patil_p

हालसिद्धनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्दमध्ये कोरोना चाचणी शिबिर

Omkar B

बेळगुंदी येथे आज हुतात्म्यांना अभिवादन

Patil_p

तुळशी विवाहानंतर लग्नासाठीच्या माठांना मागणी

Amit Kulkarni

कोगनोळी नाक्यावरील चार पोलिसांना कोरोना

Patil_p
error: Content is protected !!