Tarun Bharat

हलशी नृसिंह भूवराह मंदिराचा उद्यापासून यात्रोत्सव

आठ शतकापासून भक्कमपणे मंदिर उभे : सोमवारी मुख्य यात्रोत्सव, मंगळवारी खळय़ाच्या कुस्त्या

आप्पाजी पाटील /खानापूर

हलसी (ता. खानापूर) येथे बारा विविध उत्सव साजरे होतात. त्यापैकी श्री भूवराह नृसिंह देवाच्या वार्षिकोत्सवाला रविवार दि. 9 पासून सुरुवात होणार आहे. दि. 10 रोजी मुख्य यात्रोत्सव व मंगळवारी खळय़ाच्या कुस्त्या होणार आहेत. रात्री 9 वा. कलमेश्वर भजनी मंडळ सोनोळी (बुद्रूक) यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. उत्सवाला परिसरातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. रविवारी होमहवन, रथाची पूजा व रथोत्सव होणार आहे.

 हलशी येथील श्री नृसिंह भूवराह मंदिर आठ शतकापासून कोणतीही पडझड न होता भक्कमपणे उभे आहे. देवालयात प्रवेश करताच एक शिलालेख दृष्टीस पडतो. तो इतिहासातील हलशी शिलालेख म्हणूनच ओळखला जातो. याच शिलालेखानुसार 12 व्या शतकातील कदंब राजा परमाधी देव कदंब यांच्या विनंतीनुसार एक मठयोगी नावाच्या सत्पुरुषाने हे देवालय बांधून घेतले. व तेथे श्री नृसिंह वराह देवाची स्थापना केली. मंदिराला आज दक्षिण व उत्तर असे दोन दरवाजे आहेत. या दोन दरवाजाबरोबरच पूर्वेला दरवाजा होता. कदंब राजा तिसरा जयकेशी या राजाने श्री नृसिंह देवासमोर वराह देवाची स्थापना केली.

उत्सवाच्यावेळी मूर्तीची रथ पालखी व इतर वाहनातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. हलशीचे वैभव आजही आबाधित आहे. जनतेच्या सहकार्यातून येथे होणारे उत्सव एक अभिमानाची गोष्ट आहे. यात्रेसाठी नंदगड व खानापूरहून खासगी वाहनांची सोय करण्यात येणार आहे.

Related Stories

शेतात गांजा पिकविणाऱया दोघा जणांना अटक

Amit Kulkarni

सुतगट्टी क्रॉसजवळ साडेचार किलो गांजा जप्त

Omkar B

केएलई हॉस्पिटलसमोरील पार्किंग व्यवस्था अन्यत्र करा

Amit Kulkarni

अनगोळ मुख्य मार्गावर पथदीप बंद

Patil_p

युवकांनी उच्च शिक्षणाची शिखरे सर करावीत

Patil_p

कुद्रेमनी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p