Tarun Bharat

हलालमुक्त दिवाळी अभियानात सहभागी व्हा

हिंदू जनजागृती समितीचे आवाहन

प्रतिनिधी /पणजी

‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैध आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत केली जात आहे. त्यासाठी हलाल इंडिया, जमियत उलेमा-ए-हिंद सारख्या इस्लामी संस्थांना शुल्क देऊन त्यांच्याकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले गेले आहे. निधर्मी भारतात अशी ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने ‘हलाल प्रमाणिकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी, या मागणीसह हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक उपस्थित होते.

 सेक्मयुलर भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ म्हणजे (FSSAI) कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ? मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोज यांसारख्या विदेशी संस्था भारतात सगळय़ाच ग्राहकांना ‘हलाल’ खाऊ घालत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘हलाल प्रमाणिकरणा’द्वारे मिळणारे कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. हे प्रमाणपत्र देणाऱया संघटनांपैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांधांना सोडवण्यासाठी न्यायालयीन साहाय्य करत आहेत.  भारत सरकारचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) असतांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देणाऱया इस्लामी संस्थांची भारतात आवश्यकताच काय आहे ? या हलाल प्रमाणपत्रासाठी प्रथम 21,500 रुपये आणि प्रतिवषी नूतनीकरणासाठी 15,000 रुपये घेतले जातात. यातून निर्माण होत असलेली हलालची समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहे, त्यासाठीच या वषी हिंदूंनी दिवाळीच्या वस्तू खरेदी करतांना ग्राहकाचा हक्क वापरून ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने, मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोजचे खाद्यपदार्थ यांच्यावर बहिष्कार घालावा आणि ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

Related Stories

किरण ठाकुर यांच्याकडून दिगंबर कामत यांचे अभिनंदन

Amit Kulkarni

श्री बोडगेश्वर संस्थानच्या आमसभेत अंदाजपत्रकाला मान्यता

Amit Kulkarni

कवळे येथे बेकायदा डोंगर कापणी

Omkar B

हटविलेल्या गाडय़ाच्या जागी बेकायदा अतिक्रमण

Amit Kulkarni

सगळे एकत्रित बसून नवीन पक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब करू

Omkar B

गोवा फॉरवर्ड एनडीएतून बाहेर

Amit Kulkarni