Tarun Bharat

हल्ला प्रकरणी शिवसैनिकांनी पोलीस ठाणे गाठले

Advertisements

कणकवली / वार्ताहर

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करा, या मागणीसाठी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने असलेल्या शिवसैनिकांनी सोमवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाणे गाठले. तत्पूर्वी शिवसैनिकांनी येथील पोलिसांच्या पेट्रोलपंपासमोर शिवसेना व संतोष परब यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधकांबाबत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यासमोरच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेत मागणीचे निवेदन सादर केले. सदर हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेले आमदार नीतेश राणे यांना तात्काळ अटक करा, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख डॉ . प्रथमेश सावंत व शैलेश भोगले, जि. प. सदस्य संजय आग्रे, नीलम सावंत पालव, राजू राठोड, रामू विखाळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

सावंतवाडी बस डेपोच्या कामाची नगराध्यक्षांकडून पाहणी

NIKHIL_N

भजनी बुवा रमेश परब यांचे निधन

Ganeshprasad Gogate

जिल्ह्यात उदयापासून शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला

NIKHIL_N

घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे ‘लाईव्ह’

NIKHIL_N

अनधिकृत बांधकामासह कांदळवनही तोडले!

NIKHIL_N

गोडय़ा पाण्यातील मत्स्य पालनाला 100 टक्के प्रतिसाद

NIKHIL_N
error: Content is protected !!