Tarun Bharat

हल्ल्यानंतर ओवैसींना झेड प्लस सुरक्षा

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर असताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला. निवडणुकीपूर्वीच्या या घटनेमुळे उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, केंद्र सरकारने ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. त्यामुळे ओवैसी यांच्या ताफ्यात 36 सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.

औवेसी गुरुवारी हापूर जिल्ह्यातील प्रचारसभेहून परतत असताना नॅशनल हायवे 24 वरील छिजारसी टोल प्लाझाजवळ संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे तीन-चार लोक होते. त्यांनी गाडीवर चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी हातातील शस्त्र तिथेच सोडून पळ काढला. दरम्यान, या हल्ल्यात गाडीतील कोणलाही इजा झाली नाही. मात्र, गाडी पंक्चर झाली. त्यामुळे दुसऱ्या गाडीत बसून ओवैसी निघून गेले. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेत असदुद्दीन ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

Related Stories

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 85 लाखांवर

datta jadhav

सुष्मिता देव तृणमूलमध्ये दाखल

datta jadhav

तीन वर्षात 400 ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार

datta jadhav

केकेआरचा राजस्थानला जोरदार धक्का

Omkar B

तेलंगणामध्ये 1.20 कोटी ध्वजांचे होणार वाटप

Patil_p

गगनचुंबी इमारतीत 800 वृक्ष

Patil_p