Tarun Bharat

हवाई प्रवाशांसाठी आता दाबोळी विमानतळावर आरोग्यदायी काढा उपलब्ध

मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते झाले सेवेचे उद्घाटन

प्रतिनिधी / वास्को

दाबोळी विमानतळावर आता हवाई प्रवाशांच्या सोयीसाठी आरोग्यदायी वनस्पतीयुक्त काढा उपलब्ध करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही सोय केलेली असून हवाई प्रवाशांची शारीरीक प्रतिकार शक्ती वाढावी व त्यांनी कोरोना संसर्गाचा प्रतिकार करावा असा हेतू या उपाययोजनेमागे आहे. वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सोमवारी दुपारी या सेवेचे उद्घाटन केले.

यावेळी दाबोळी विमानतळ संचालक गगन मलीक व इतर अधिकारीही उपस्थित होते. दाबोळी विमानतळाच्या आवारात आरोग्यदायी पेय हवाई प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेले असून या पेयामध्ये तुलसी, आले, लवंग, वेलची, मिरी व इतर आयुर्वेदीक घटक असतील. सर्वसामान्यांच्या भाषेत याला काढा असे संबोधण्यात येते. मागच्या पाच महिन्यांत कोरोनाचा संसर्ग पसरू लागल्यापासून आयुवेर्दीक पेय असलेल्या काढय़ाला चांगले दिवस आलेले आहेत. देशी विदेशी प्रवाशांसाठी हा काढा आता दाबोळी विमानतळावरही उपलब्ध असेल. या उपक्रमासाठी विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला होता. पुन्हा पुन्हा लॉकडाऊण करणे शक्य नसून आर्थिक प्रश्नही लक्षात घेण्याची गरज आहे. दाबोळी विमानतळाने एक चांगला उपक्रम सुरू केल्याचे सांगून मंत्री गुदिन्हो यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अभिनंदन केले.

Related Stories

लोहिया मैदान सौंदर्यीकरण रखडले राज्यपालांकडूनही संताप व्यक्त

Omkar B

कुंकळ्ळीतील डॉ. सतीश फळदेसाई यांचे निधन

Omkar B

पिळर्ण ‘बर्जर पेंट’मध्ये आगीचे तांडव

Amit Kulkarni

मांद्रे विकास परिषदेला अनुदान सुरु करा

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयात मुसळधार पाऊस

Amit Kulkarni

नारकोटीक्स ब्युरोकडून कळंगूटातील राजकारण्यांची चौकशी व्हावी

Patil_p