Tarun Bharat

हवामानात आद्रता वाढल्यामुळे बुरशीच्या प्रमाणात वाढ

Advertisements

सत्तरी तालुक्मयात नारळाच्या झाडांच्या मृत्यू प्रमाणात वाढ.

वाळपई / प्रतिनिधी

 गेल्या जवळपास पाच वर्षापासून सत्तरी तालुक्मयात नारळाच्या झाडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे नारळ उत्पादक चिंता निर्माण झाले असून गेल्या काही वर्षापासून सातत्याने मोठय़ा प्रमाणात बागायती मधील नारळाची झाडे मृत्यूच्या कळपात सापडत असल्यामुळे ?णाऱया काळात सत्तरी तालुक्मयातील नारळाचे उत्पादन झपाटय़ाने खाली येण्याची शक्?यता वर्तविली जात आहे .यासाठी गोवा राज्याच्या कृषी खाते यंत्रणेने संशोधनात्मक काम करून सदर मृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कृती करणे गरजेचे आहे .अन्यथा गोव्यामध्ये यासंदर्भातील लाट पसरण्यास वेळ लागणार नसल्याचा नारळ उत्पादकांच म्हणणे आहे.

अचानकपणे नारळाची झाडे मरणाचे प्रमाणात वाढ.

दरम्यान या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्मयात गेल्या पाच वर्षापासून नारळाची झाडे मरण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात याकडे मोठय़ाप्रमाणात गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. मात्र हळूहळू त्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे उत्पादकांमध्ये खळबळ निर्माण झाली. जवळपास सर्वच गावातील नारळाची झाडे मरण्यास  प्रारंभ झालेला आहे. आतापर्यंत जवळपास हजार पेक्षा जास्त झाडे मृत्यूच्या दाढेत सापडली असून यामुळे सत्तरी तालुक्मयातील नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. गोव्यामध्ये नारळाचे दर झपाटय़ाने वाढत आहे. यामागचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते मात्र याकडे सरकारने अजूनपर्यंत गांभीर्याने लक्ष न दिल्याचे समोर आलेले आहे.

शेंडीपासेन मरण्यास सुरुवात.

 दरम्यान अनेक नारळ उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार नारळाचे मृत्यूचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. याची सुरुवात नारळाच्या झाडाच्या शेंडीपासून होत असते. अचानकपणे ही शेंडी सुकते व हळूहळू झाड मरण्यास सुरूवात होते. सुरुवातीच्या काळात या संदर्भात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत मात्र एकदा शेंडी सुकण्यास सुरुवात झाली की मग नारळाचे झाड मरण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. यासंदर्भात अनेक स्तरावर उपाययोजना करून बघितल्या मात्र सदर प्रकारच्या उपाययोजना अजून पर्यंत यशस्वी न झाल्याचे समोर आले आहे.

बागायतीमधील इतरांवर परिणाम.

  दमदार अनेक नाऱळ उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार बागायतीमधील एकदा नारळाचे झाड मृत्यूच्या दारी सापडले की त्याचा प्रतिकूल परिणाम इतर झाडावरही होत असतो. बागायतीमध्ये सुपारीची आंब्याची केळीची असे अनेक प्रकारचे झाडे असतात. यामुळे मेलेल्या माडाचे झाड कापताना इतर झाडांनाही नुकसान होत असते .यामुळे नारळाच्या झाडांच्या मृत्युचे प्रतिकूल परिणाम बागायतीवर होत असून यामुळे नारळ उत्पादकावर चिंता निर्माण झालेली आहे.

नारळाचे दर गगनाला.

  दरम्यान गेल्या दोन वर्षापासून गोव्यामध्ये नारळाचे दर गगनाला भिडलेले आहे. गोमंतकीयांच्या जेवणामध्ये नारळ अत्यावश्यक असतो. सध्या नारळाचे उत्पादन बऱयाच प्रमाणात कमी झालेले आहे. तालुक्मयात मात्र या नारळाच्या उत्पादनावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र समोर आलेली आहेत. अशा अवस्थेत माडांच्या मृत्यूच्या संदर्भात संशोधन होऊन त्यावर उपाय योजना न निघाल्यास येणाऱया काळात नारळाचे दर सर्वसामान्य अजिबात परवडणारे नाही .यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत नारळाची झाडे मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडलेली आहेत .मोठय़ा प्रमाणात खर्च करून नारळाची झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे यासंदर्भातही उत्पादकांना बऱयाच प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे. कृषी खात्याने यावर विशेष योजना राबवून त्यांना समाधानकारकरीत्या आर्थिक पाठबळ देण्याची मागणी उत्पादकांनी केलेली आहे. काही नारळ उत्पादकांचे जवळपास 100 पेक्षा जास्त नारळाची  झाडे नुकसानी सापडलेली आहे. त्यांना आर्थिक नुकसान सहन करावी लागली याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे नारळी उत्पादकांचे म्हणणे आहे.

बुरशीमुळे झांडाची नाशाडी. शेतकी अधिकारी विश्वनाथ गावस.

दरम्यान यासंदर्भात वाळपईचे शेतकी अधिकारी विश्वनाथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षापासून नारळाच्या झाडावर बुरशीचा रोग आलेला आहे. हा बुरशीचा रोख नारळाच्या शेंडीवर प्रथम आघात करतो . त्यानंतर हळू हळू शेंडीच्या माध्यमातून मुळापर्यंत जाऊन झाडांना नुकसानी करतो. गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात हवामानात वाढलेली आद्रता याचा प्रतिकूल परिणाम या झाडावर झाल्याचे ते म्हणाले. हवामानातील आद्रता वाढत असल्यामुळे बुरशीच

प्रमाणे हळूहळू वाढू लागते व यामुळे नारळाच्या झाडावर आघात निर्माण होत असतो .बुरशीचा प्रादुर्भाव इतर झाडावर होत नाही यामागचे कारण विशद करताना विश्वनाथ गावस यांनी सांगितले की बुरशीचा प्रभाव इतर झाडावर होतो मात्र इतर झाडांना अनेक फांद्या असल्यामुळे त्यांचे जगण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र नारळाच्या झाडांना एकमेव शेंडी येत असते व त्याच्यावर बुरशीचा आघात झाल्यास झाड मरुन जाते असे यावेळी ते म्हणाले.

पारंपरिक पाडेली अभावामुळे प्रादुर्भाव वाढला.

याबाबत शेतकी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले की एकेकाळी या झाडावरचे नारळ काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीचे पाडेली उपलब्ध होते .माड पाडण्यासाठी पाडेली झाडाच्या शेंडीपर्यन्त जात होते व नारळ काढण्याच्या निमित्ताने सदर शेंडीवर असलेले अनेक सुखी चुडते साफ करण्यात येत होती. आता पारंपारिक पाडेले यांचे प्रमाण बऱयाच प्रमाणात कमी झालेले आहे. नारळ काढण्यासाठी आता मशीनचा वापर करण्यात येत असतो  .यामुळे फक्त मशीनवरून नारळ काढणारा इसम फक्त नारळ काढतो. मात्र शेंडी भागात असलेला कचरा साफ करत नाही. यामुळे शेंडीचा प्रादुर्भाव वाढण्यास अधिक मदत होत असते असे यावेळी ते म्हणाले .यावर उपाययोजना करण्यासंदर्भात यांनी सांगितले बुरशी नियंत्रक औषधांचा वापर केल्यास या नारळाच्या झाडांचे मरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते .यासंदर्भात काही नारळ उत्पादकांनी प्रयोग केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे. मात्र यासाठी पारंपारिक पाडेलीची गरज असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

मी काँग्रेसमध्ये राहिन की नाही, याबाबत मीच साशंक : दिगंबर

Patil_p

दमण पोलीस कोलव्यात

Patil_p

चोवीस तासांत 631 बाधित

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटी तर्फे महिला दिन साजरा

Omkar B

लग्न सोहळ्य़ात ‘कोरोना’कडे दुर्लक्ष

Patil_p

कुडचडे पालिकेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Omkar B
error: Content is protected !!