Tarun Bharat

हवामान बदलांच्या परिस्थितीत जी. एम. पिकांची उपयुक्तता

सध्या हवामान बदलांच्या परिस्थितीत शेतीव्यवस्थेला जावे लागते. त्यामुळे शेतीव्यवस्थेचे आणि शेतकऱयांचे खूपच नुकसान होते. केलेली गुंतवणूक वाया जाते आणि शेती संरचनेचेदेखील अतोनात नुकसान होते. उत्पादन तर शून्यावर जाते. आले तरी त्याची गुणवत्ता कमी होते. मार्केटिंगचा मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. या सर्वांवर एकच उपाय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे. तो म्हणजे जी. एम. पिकांची लागवड करणे. जी. एम. पिकांच्या लागवडीमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो. औषधे, तणनाशके, किडनाशकाचा वापर कमी होतो. उत्पादन वाढते. चव, स्वाद आणि सत्वांची गुणवत्ता वाढते. आरोग्याला अनुकूलता निर्माण होते. पण त्याला पर्यावरणवादी शास्त्रज्ञांचा विरोध आहे. जे नैसर्गिक आहे, तेच गुणवत्तेचे आणि आरोग्यास हितकारक असते. पण त्याची पणन गुणवत्ता आणि पणन मूल्य कमी राहते. म्हणून औषध फवारणी, किडनाशके आणि रासायनिक खतांचा वापर अधिक होतो. त्यामुळे पर्यावरण, जीवसृष्टी आणि सजीवांचे आरोग्य धोक्मयात येते. अशा विचित्र कात्रीत शेतीव्यवस्था आणि शेतकरी अडकलेले आहेत.

हवामान बदलामुळे कृषी उत्पादनावर तिहेरी परिणाम होतो. उच्चस्थानावरील सरासरी उच्च उष्णतेमुळे पिकांचे आयुष्य वाढते. त्यामुळे पीक उत्पादन थोडेसे वाढते. पण न्यूनस्थानावरील कमी उष्णतेमुळे कृषी उत्पादन कमी होते. तसेच मृद-आरोग्य बिघडल्यामुळे कृषी उत्पादन घटते, असे निदर्शनास आले आहे. अतिपावसामुळे जमिनीची धूप होते. मातीचा कसदार भाग वाहून जातो. त्यामुळे कृषी उत्पादन कमी होते. कमी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे पिकांची उत्पादकता कमी होते. शेतीतील पिकांना कार्बनची आवश्यकता असते. पण त्याचा अमर्याद पुरवठा वाढला की तपमान वाढते आणि नुकसानीचे प्रमाण वाढते. ग्लोबल वॉर्मिंगमुळेच हवामान बदल घडून येतात. म्हणजेच तपमान, आर्द्रता आणि पाऊसमान अतिकिंवा न्यून होते. कार्बनच्या वाढीमुळे ओझोनचा स्तर दुबळा होतो. परिणामी सहन न होणारी उष्णता वाढते. त्यामुळे कृषी उत्पादन घटते. तसेच दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, वादळ, शीत लहर, उष्ण लहर यामध्ये वाढ होऊन कृषी उत्पादन कमी होते. तसेच नवे किड, रोग आणि बुरशी जन्माला येते. त्यावर संशोधन अपरिहार्य ठरते. मूळ प्रश्न न सोडविता समोर आलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीवरच शास्त्रज्ञ भर देतात. पण हवामान बदलाच्या परिस्थितीतदेखील शेतीचे अस्तित्व टिकवून शेती उत्पादनामध्ये कशी वाढ करता येईल? हे आव्हानात्मक असले तरी आवश्यक बाब आहे.

हरित जीवशास्त्राच्या साहाय्याने वातावरणातील हरित वायुचे प्रमाण कमी करून हवामान बदलातील सातत्य कमी करता येते. विशेषतः कार्बन डायऑक्साईड वायुचे प्रमाण कमी होऊ शकते. मृद घटकांमध्ये सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढविणे, रासायनिक खतांऐवजी जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि मृद घटकांमध्ये हय़ुमसचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.

तणांचा ताण सहन करणारी पीक संरचना निर्माण करणे शक्मय आहे. तसेच दुष्काळसोशिक पिकांचे वाण शोधता येते. तसेच नैसर्गिक घटकांच्या विघातक कृतीला आळा घालण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. कॅस्पर कॅस 9 व 12 च्या तंत्रज्ञानाने पिकांच्यातील प्रतिकारशक्ती निर्माण करता येते. रोग, किड, बुरशीवर मात करता येते. चव, स्वाद, सत्व गुण वाढविता येतात. तण प्रतिबंधक पिकांचे नवे वाण निर्माण करता येते. जैवतांत्रिक पिकांच्या निर्मितीमुळे किटकनाशके, औषधे व तणनाशकावर कमी फवारणी झाल्यामुळे 2011 साली 37 दशलक्ष किलोग्रॅम औषधांची फवारणी कमी झाली. सी. ओ. 2 मध्ये सुमारे 23.5 अब्ज किलोग्रॅमनी घट झाली. म्हणजे 10.2 दशलक्ष कारचे प्रदूषणाइतके कार्बन कमी झाले.

जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने पिकांचे नवनवीन वाण मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. क्षारसोशिक गहू, बार्लिमध्ये असे 35 जनुके निर्माण करून क्षारपड व क्षारपीडित जमिनींवर त्यांची लागवड करण्याचे तंत्र ऑस्ट्रेलियातील काही शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. 2009 ते 2015 या दरम्यान क्षारपड जमिनीवर उसाची लागवड करण्यासाठी उसाची नवी जात (OSDREBIA) निर्माण करण्यात यश मिळाले आहे. भात, मका आणि सोयाबिन पिकामध्येदेखील क्षारसोशिक आणि दुष्काळसोशिक गुणधर्म निर्माण करून त्यांची लागवड क्षारपीडित व दुष्काळी भागात करता येण्याजोगे नव्या वाणांची निर्मिती झालेली आहे. यामुळे नवीन वन अथवा पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याची गरज नाही. यामुळे जंगल, डोंगर व नैसर्गिक नाले जिवंत राहतील आणि पर्यावरणाच्या संतुलनाला मदत करतील. उष्ण अथवा शीत हवामानामध्येदेखील अनुकूल ठरणाऱया नव्या वाणांची निर्मिती झालेली आहे.

हवेतील अधिक कार्बन शोषून घेणाऱया नव्या पीकवाणांची निर्मिती झालेली आहे. साखर कार्बनपासूनच तयार होते. त्यामुळे उसाच्या पालांना आणि मुळांना कार्बनची अधिक आवश्यकता असते. एका एकर ऊस क्षेत्रातील ऊस वर्षाला साधारणतः 70 ते 100 टन कार्बन शोषून घेतो. अशा अनेक पिकांची गुणवैशिष्टय़े ओळखून संबंधित वाणांची निर्मिती होत आहे. विशेषतः भातामध्ये असे प्रयोग केलेले आहेत. त्या अनुषंगाने फोटोसिन्थेसिस पद्धतीमध्ये बदल करण्यात शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. अन्न व कृषी संघटनेच्या यु. एन. क्लायमेट चेंज कॉन्फरन्स (31-10-21 ते 12-11-21) मध्ये नव्या शेतीसंबंधी चर्चा झाली. त्यामध्ये हवामान बदलांच्या परिस्थितीतसुद्धा यशस्वीपणे शेती करता येईल, अशी पीक संरचना निर्माण करण्यावर भर देण्यात आला होता. हवामान बदल आणि कोरोनामुळे सुमारे 811 दशलक्ष लोक कुपोषित झालेले आहेत. ही समस्या 2030 पर्यंत सोडविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी हरित शहरे, 1000 डिजिटल गावे, अर्थ मॅप, डिजिटल फूड सिस्टम या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. पर्यावरण मंत्रालयाने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.तणसोशिक पिकांच्या लागवडीमुळे मृद आरोग्य सुधारण्याचे प्रयोग जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी होत आहेत. क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर लोकप्रिय होत आहे. कार्बन-फार्मिंगचे संयुक्त योगदान असलेली पीक संरचना निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. जागतिक अन्नसाखळीमध्ये बिघाड निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जैवतंत्रज्ञानाने तयार केलेल्या पिकांच्या लागवडीचा विचार सर्व देशांनी केला पाहिजे.

जानेवारी 2022 मध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमतीमध्ये 1.1 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. डेअरी उत्पादनांच्या किमतीमध्येदेखील 2.4 टक्क्मयांनी वाढ झालेली आहे. अन्नपदार्थांबरोबर तेलाच्या किमतीदेखील वाढत आहेत. भारतासारख्या कृषी आधिक्मय लाभलेल्या देशाला याचा लाभ घेता आला पाहिजे. म्हणूनच 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये तेलबियांच्या लागवडीमध्ये वाढ करण्याची संधी देण्याची तरतूद केलेली आहे. जी. एम. पिकांची लागवड केली नाही तर अन्नधान्याच्या किमती सातत्याने वाढण्याचे संकेत मिळतात.

– डॉ. वसंतराव जुगळे

Related Stories

मुंबईकरांनो मीठ जपून खा

Patil_p

2020: राजकीय सापशिडीचा खेळ

Patil_p

संतुलिन श्वसन पद्धती

Patil_p

कौटुंबिक आरोग्याची ऐशीतैशी

Patil_p

विनाशकाले विपरीत बुद्धि:।

Patil_p

केंद्रस्थानीचा भाजप आणि इतर!

Patil_p