Tarun Bharat

हवालदार संजय साबळेंकडून मुख्यमंत्री निधीस मदत

प्रतिनिधी/ सातारा :

सातारा पोलीस दलातील हवालदार संजय साबळे हे कर्तव्य बजावताना देखील नेहमीच तत्पर असतात. अनेक वेळा माणुसकीच्या भावनेतून त्यांच्यातील पोलीस अनेकांच्या मदतीलाही धावत असतो. सामाजिक बांधिलकीचे भान नेहमीच जपणाऱया हवालदार साबळे यांनी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा न करता कोरोनाच्या युध्दात आपला खारीचा वाटा असावा या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 हजार रुपयांची मदत केली. साबळे यांनी कोरोना संकटाच्या काळात केलेल्या मदतीचे पोलीस विभागात कौतुक होत आहे.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी सातारा शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार संजय साबळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 हजार रुपयांची मदत केली आहे. कोरोनाची लढाई सुरु झाल्यापासून आपल्या सहकाऱयांसमवेत साबळे रस्त्यावरची लढाई लढत आहेत.

कोरोना वॉरियर हवालदार साबळे यांच्या लग्नाचा वाढदिवस गुरुवारी होता. तो कोणताही समारंभ न करता त्यांनी कोरोना लढाईला मदत करत साजरा केला. या निमित्ताने त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी 11 हजार रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा धनादेशत आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला आहे.

Related Stories

‘खासदार हेल्थ कार्ड’ योजनेपासुन सातारकर वंचित

Patil_p

अतिक्रमणे काढून घ्या नाही तर कारवाई

Patil_p

सांडवलीकरांना तात्पुरते स्थालांतरित होण्याच्या सूचना

datta jadhav

अन्यथा रणसंग्राम करून शेतकऱयांना न्याय मिळवून देणार

Omkar B

काँग्रेसने केले इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

Patil_p

पावसाने विश्रांती घेतल्याने धरणे अर्ध्यावरच, दुष्काळी तालुक्यातील शेती धोक्यात

Archana Banage