Tarun Bharat

हसापूर येथे शिवजन्मोत्सव उत्साहात

अ गो क्षत्रिय मराठा समाज  पेडणे समितीचे  आयोजन

वार्ताहर /पालये

पेडणे  छत्रपती चे कार्य अद्वितीय आहे त्यांच्या विचारांची खरी गरज आज आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एका जाती किंवा  धर्मा पुरते मर्यादित नव्हते त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली . त्यामुळेच आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते  असे उद्गार पेडणे येथील युवा उद्योजक अँड शाम शेटय़? यांनी काढले.

हसापूर येथे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज ,पेडणे तालुका समिती ने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळय़ा त  प्रमुख पाहुणे  म्हणून ते बोलत होते श्री देवी सातेरी देवी मंदिर येथील सभा मंडपात हसापूर येथे आयोजित केलेल्या या सोहळय़ास अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका अध्यक्ष अँड मुरारी परब ,हसापूर सरपंच संतोष मळीक,माजी अध्यक्ष सुभाष पार्सेकर,राजमोहन शेटय़?,राजेंद्र शेटगावकर,सातेरी कलामंदिर चे अध्यक्ष सुहास मळीक,खजिनदार रमेश मळीक ,संतोष पालयेकर,रामा बापू शेटय़?,दिलीप शेटय़?  ,सुहाना मळीक,मितेश पार्सेकर,विठ्ठल मळीक,गजानन मळीक,अक्षता मळीक, सचिव निलेश नाईक,,सुनील मळीक,सखाराम परब,अजय मळीक,गोविंद नाईक,हर्ष मळीक,संकल्प नाईक,रुचिरा मळीक,आदी मान्यवर  उपस्थित होते  

आज युवकांना बुद्धी कौशल्याची गरज आहे  हे कौशल्य शिवाजी महाराजांकडे होते त्यामुळे च ते स्वराज्याचे तोरण बंधू शकले असेही अँड शेटय़? म्हणाले

शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात हिंदवी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली एक पराक्रमी राजा म्हणून त्याचे नाव संपूर्ण भारतात नव्हे तर जगात घेतले जात आहे .ते त्यांच्या कडे असलेलया अतुलनीय पराक्रमामुळेच आज त्याचे चरित्र भावी पिढी समोर येण्याची गरज आहे ,असे मत सरपंच संतोष परब यांनी व्यक्त केले

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज तालुकाध्यक्ष अँड मुरारी परब यावेळी म्हणाले कि समाज एकसंध राहण्यासाठी सर्व समाज बांधवांचे सहकार्य अपेक्षित आहे  .

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले तर आणि शेटय़? यांनी शिव प्रतिमेचे पूजन केले व शिवप्रतिमेस पुष्पा?जली वाहिली .

त्या नंतर हसापूर येथील गोविंद नाईक यांच्या अश्वा? वरून छत्रपतीं च्या प्रतिमेची मिरवणूक काढली .कार्यक्रमाचे सूत्र निवेदन सखाराम परब  यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव निलेश नाईक याची केले .यावेळी तालुका समिती चे सर्व पदाधिकारी व समाज बांधव शिव प्रेमी मोठया संख्येनं उपस्थित होते

Related Stories

मगो व युती पक्ष सत्तेवर आल्यास गोव्याला कर्जमुक्त करू

Amit Kulkarni

लाखाच्या चोरीप्रकरणी मोलकरिणीला जामीन

Omkar B

पाज-शिरोडा गावाला चिंता पाणी टंचाईची

Omkar B

मडगावातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Amit Kulkarni

बाणावली आरोग्य केंद्रात डॉक्टरांची 24 तास उपलब्धता हवी : वेंझी व्हिएगस

Amit Kulkarni

फोंडा शहरानंतर शिरोडय़ात फ्लॅट फोडून 20 लाखाचा ऐवज लंपास

Amit Kulkarni