Tarun Bharat

‘हाउस ऑफ द ड्रगन’चा ट्रेलर सादर

गेम ऑफ थ्रोन्सचा प्रीक्वेल

‘गेम ऑफ थ्रोन्स’चा प्रीक्वेल ‘हाउस ऑफ द ड्रगन’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात ड्रगनची जबरदस्त झलक दिसून येत आहे. या सीरिजची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘हाउस ऑफ द ड्रगन’ सीरिज एचबीओ मॅक्सवर 21 ऑगस्ट रोजी प्रीमियर केली जाणार आहे. भारतात डिस्ने प्लस हॉटस्टारवर 22 ऑगस्टपासून ही सीरिज पाहता येणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढविली आहे.

ट्रेलरची सुरुवात किंग विसरीज टारगेरियनसोबत होते, जो थ्रोनवर स्वतःच्या पसंतीच्या उत्तराधिकाऱयाला पाहण्याच्या स्वप्नाविषयी बोलताना दिसून येतो. त्याची पहिली मुलगी रेनेरा प्रथम दावेदार आहे, परंतु ‘कुणी राणी कधीच आयर्न थ्रोनच्या गादीवर बसलेली नाही’ असे तो म्हणत असल्याचे दिसून येते. यावरून तेथे युद्ध होण्याचे संकेत दाखविण्यात आले आहेत.

हाउस ऑफ द ड्रगन ही सीरिज 2018 मध्ये आलेली आर.आर. मार्टिन यांची कादंबरी ‘फायर अँड ब्लड’वर आधारित आहे. हे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि क्रॉनिकल्सच्या घटनांच्या 200 वर्षे पूर्वी हाउस टारगेरियनच्या अंताची सुरुवात आणि टारगेरियन सिव्हिल वॉरच्या दिशेने जाणाऱया घटना डान्स ऑफ द ड्रगन म्हणून ओळख्घ्ले जाते. 21 ऑगस्टपासून प्रीमियर होणाऱया पहिल्या सीझनमध्ये 10 एपिसोड्स असतील.

Related Stories

सुशांत आत्महत्या : बिहार सरकारकडून CBI चौकशीची शिफारस

Tousif Mujawar

11 नोव्हेंबरला झळकणार समांथाचा ‘यशोदा’

Amit Kulkarni

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage

हवेत उडणारी कार

Amit Kulkarni

सुशांतशिवाय 12 वर्षांनी ‘पवित्र रिश्ता’

Patil_p

बॉलिवूडमध्ये पुनरागमनाच्या तयारीत आयुष

Amit Kulkarni