Tarun Bharat

हाणामारीत जखमी युवकाचा मृत्यू

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा

प्रतिनिधी/ बेळगाव

एक महिन्यापूर्वी तुरमुरी (ता. बेळगाव) येथे हाणामारीत जखमी झालेल्या शास्त्राrनगर येथील युवकाचा बुधवारी रात्री खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप तुकाराम कांबळे (वय 38, रा. शास्त्राrनगर) असे त्या युवकाचे नाव आहे. 8 सप्टेंबर रोजी भाऊबंदकीच्या वादातून तुरमुरी येथे हाणामारीची घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या दिलीपवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत होते. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे.

हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल करून पोलिसांनी 16 जणांना अटक केली होती. त्यांची जामीनवर मुक्तताही झाली आहे. हल्ल्यानंतर एक महिन्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

कोरोनामुळे सरकारी शाळांची पटसंख्या वाढली

Patil_p

वसती योजनांतून घरे मंजूर करा

Patil_p

येळ्ळूर संपूर्ण लॉकडाऊन; ग्रा.पं.कडून जनजागृती

Amit Kulkarni

पिरनवाडी येथील कचरा समस्या सुटणार कधी?

Amit Kulkarni

झाडे-पाणी वाचविण्याबाबत जागृतीफेरी

Omkar B

डॉ.स्मिता प्रभू यांची विशेष मुलांच्या उपचार पद्धतीवर पीएचडी

Amit Kulkarni