Tarun Bharat

हातकणंगलेत मतदान प्रक्रिये संदर्भात पहिले प्रशिक्षण शिबिर संपन्न

Advertisements

प्रतिनिधी / इचलकरंजी

हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया यशस्वी करणेसाठी मतदान अधिकाऱ्यांना निवडणूकीमधील मतदान प्रक्रिया संदर्भात पहिले प्रशिक्षण हातकणंगलेचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.

हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहेत. या २१ ग्रामपंचायतीमध्ये १७३ मतदान केंद्रे आहेत. तर ९४ प्रभागांतून २५९ जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यासंदर्भात पहिले प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये पहिल्या सत्रामध्ये ४४० मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तर दुपारच्या सत्रामध्ये ४६० जणांना प्रशिक्षण देण्यात आले असे एकूण ९०० मतदान अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रास एक केंद्राध्यक्ष व सहाय्यक तीन मतदान अधिकारी असे चार जणांचे पथक गठीत केले आहे.

हातकणंगले तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे यांनी मतदान अधिकाऱ्यांना क्लास रूम ट्रेनिंग व यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक यांचे प्रशिक्षण दिले. पहिले प्रशिक्षण इचलकरंजी मधील घोरपडे नाट्यगृहामध्ये संपन्न झाले. त्यांना या प्रशिक्षणामध्ये इचलकरंजीचे तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार शोभा कोळी, नायब तहसीलदार दिगंबर सानप यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

फायबरची मूर्ती अन् मदतीची कीर्ती

Archana Banage

साताऱ्यात 13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Archana Banage

कराड ते काठमांडू सायकलस्वारांचे स्वागत

Patil_p

अवकाळीने सातारकर वैतागले

Patil_p

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती

datta jadhav

लहान भावाच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्या भावानेही सोडला प्राण!

Archana Banage
error: Content is protected !!