Tarun Bharat

हातकणंगले काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीबाबत तहसीलदारांना निवेदन

Advertisements

प्रतिनिधी / हातकणंगले

हातकणंगले काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीत कपात करण्याचे निवेदन हातकणंगले तहसीलदारांना देण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाच्या किमती कमी होत्या. त्यावेळी इंधनाचे दर स्थिर होते पण लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील दळणवळण सुरू झाल्यानंतर इंधन दरवाढ होत गेली. या दरवाढीचा फटका वाहतूक व्यवसायिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. राज्यांमध्ये सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच आर्थिक स्थितीही बिघडले आहे यातच इंधनाच्या किमती झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत असून वाहतूक व्यावसाईक पूर्णपणे संकटात आहे.

या दरवाढीमुळे मालवाहतूक व प्रवासी वाहतूकीचे दर वाढण्याची शक्यता आहे यामुळे बाजारातील वस्तूंचा भाव देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दररोज होणाऱ्या इंधन दरवाडी मध्ये कपात करून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी असे या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे हे निवेदन देताना हातकणंगले मतदार संघाचे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे, हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भगवानराव जाधव, बाजीराव सातपुते, बबनराव पाटील, बाळगोंडा पाटील, शकील अक्कतार, पोपटराव इंगवले, सुनिल भोसले, पिंटू किणिंगे, भैरवनाथ पवार, इत्यादी उपस्थित होते.

Related Stories

सातारलाही बनावट क्रीडाप्रमाणपत्राच्या संसर्गाची बाधा!

Patil_p

कोल्हापूर : अवनितील १५ मुली कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

यशवंत जाधव यांचा 1000 कोटींचा घोटाळा, दोन वर्षात 36 इमारतींची खरेदी

datta jadhav

विलासपूर-शाहूपुरी येथे पालिकेच्या विभागीय कार्यालयांची मागणी

Patil_p

कोल्हापूर : स्त्री भ्रुणहत्येतील दोषींवर कठोर कारवाई करा

Abhijeet Shinde

रोहित पवारांच्या निशाण्यावर सदाभाऊ; म्हणाले, भाजपाचे मोठे नेते…

Rahul Gadkar
error: Content is protected !!