Tarun Bharat

हातकणंगले : ग्रामीण रुग्णालयातील लिपिक लाच घेताना जाळ्यात

हातकणंगले / प्रतिनिधी

विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरीता ३००० हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील वर्ग ३ चा कनिष्ठ लिपिक सुधीर अमितचंद चौधरी रा. रूक्मिणी हाऊसिंग सोसायटी संजयनगर व त्याचे खाजगी दोन एजंट सचिन शिवाजी भोसले रा. नेज आणि सौरभ अरविंद नर्ले रा.नेज याच्यावर सापळा रचून लाचलुचपत विभागाची कारवाई केली

मिळालेल्या माहीती नुसार हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेला सुधीर अमितचंद चौधरी याने विवाह नोंदणी करून दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजार रूपयांची लाच मागितली आणि ती रक्कम आपला एजंट सचिन भोसले आणि सौरभ नर्ले याकडे देण्यास सांगीतले त्यानुसार तक्रारदार यांनी आज ती रक्कम एजंट सौरभ नर्ले यांना देताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. आज दुपारी ३ वाजता ही कारवाई उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्‍या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संजीव बंबरगेकर, पो.ना. विकास माने, सुनिल घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने,चालक पो. शि. सुरज अपराध आदींनी केली.

गेल्या पंधरा दिवसात दुसर्‍यांदा हातकणंगले तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने भ्रष्टाचार करणारे अधिकारी चांगलेच हाडबडले आहेत याआधी महसूल मधील रेकॉर्ड विभागामध्ये पंधरा दिवसापूर्वी कारवाई करत लिपीकास पकडले होते. आज झालेल्या कारवाईत ग्रामीण रुग्णालयातील लिपिक जाळ्यात सापडला आहे यामुळे हातकणंगले शासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येत आहे

Related Stories

रुईतील शेतकऱ्याचा मुलगा बनला धर्मादाय सह आयुक्त

Archana Banage

कोल्हापूर : बार उघडले…, मंदिरं कधी ?

Archana Banage

मुल नसल्याने साताऱ्यातील बालकाचे अपहरण; 48 तासानंतर आईच्या कुशीत

Abhijeet Khandekar

सरवडे येथे दूधगंगा नदीत आढळला मृतदेह

Archana Banage

कोल्हापूर : अंगठ्यांचे ठसे न उमटणाऱ्यांना मिळणार ‘आय स्पॅनर’द्वारे धान्य

Archana Banage

Kolhapur; रसायनशास्त्र विभागात कुरघोड्यांचे राजकारण परीक्षेतही !

Abhijeet Khandekar