Tarun Bharat

हातकणंगले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या लढ्याला अखेर यश

Advertisements

पतसंस्थेतील कर्मचारी वर्गास सेवा नियम लागू करणे बाबत आदेश जारी

वार्ताहर / कबनूर

नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण बिगरशेती महिला क्रेडिट सोसायटी सहकारी पचन संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा नियम व भविष्य निर्वाह निधी नियम तयार करून सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने नियम अमलात आणावेत असा निर्देश सहकार आयुक्त पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

हातकणंगले तालुका ग्रामीण बिगरशेती ,नागरी, महिला, को ऑपरेटिव्ह सोसायटी, सेवक पतसंस्था कर्मचारी संघटना यांच्या वतीने पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना सेवा नियम व भविष्य निर्वाह निधी बाबत आवाज उठवून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या संघटनेकडून वेळोवेळी केलेल्या लढ्यास अखेर यश आले असल्याचे संघटनेच्या पदाधिकारी सांगितले.

केवळ कर्मचारी वर्गाचा विचार न करता सहकारी व नागरी पतसंस्था टिकल्या पाहिजेत या तत्वास अनुसरून नियामक मंडळाच्या अंशदान असो किंवा इतर जाचक अटीमुळे पतसंस्थेचे भवितव्य कसे अडचणीत येईल याबाबत सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते. याकामी हातकणंगले तालुक्यात बोध घेऊन जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील सर्व पतसंस्था कर्मचारी संघटनांनी संस्था कामकाज बंद ठेवून आपला रोष व्यक्त केला होता.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या बरोबर या विषयावर चर्चा करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे, जनरल सेक्रेटरी महेश कडाले यांनी सहभाग घेऊन सेवानियम बाबतचे निवेदन देऊन सहकार मंत्र्यांच्या समोर समस्या मांडल्या. त्यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत नवीन आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुसार सहकार आयुक्त पुणे जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांनी पतसंस्थेतील कर्मचारी वर्ग सेवा नियम लागू करणे बाबतच्या आदेश जारी केले आहे.

महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण बिगर शेती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पगारदार सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या साठी सेवा नियम व भविष्य निर्वाह निधी नियम तयार तयार करणेबाबत परिपत्रका द्वारे स्पष्ट सूचना दिलेल्या असून त्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यासाठी सेवा नियम व भविष्य निर्वाह निधी नियम तयार करून सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने हे नियम अमलात आणावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. पतसंस्थांना सहकार आयुक्त कार्यालय कडील परिपत्रकातील सूचनास अनुसरून कार्यवाही करणेबाबत सुचित करण्यात यावे असे आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे सहकारी संस्था कोल्हापूर यांनी उपनिबंधक सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांना दिले आहेत. नवीन आदेशानुसार सर्व संस्थांना कर्मचारी वर्ग सेवा नियम लागू करणे बंधनकारक होणार आहे. या निर्णयामुळे सर्व कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेव्हा नवीन आदेशाचे संस्थांच्या संचालक मंडळास संस्थेतील कर्मचाऱ्यास सेवा नियम लागू करणेबाबत कार्यवाही व्हावी असे आव्हान संघटनेने केले आहे. याकामी उपाध्यक्ष अनिल हजारे, अनिल पाटील, अरविंद जाधव, रंगराव शेणवी, शशिकांत पिसे, शिराज शेख, शेखर जोशी, दादासो कत्ते, गणपती परीट, सुभाष माळी, दिलीप आवळे देवाप्पा खूडे ,रजनी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Related Stories

दक्षिण’मधील सर्व ३४ ग्रामपंचायती विधवा प्रथा बंदी ठराव करणार

Kalyani Amanagi

गोकुळ निवडणूकसंदर्भात भाजपच्यावतीने समरजीत घाटगे चर्चा करणार

Abhijeet Shinde

Kolhapur; वाघवेत नोकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘धडक’

Sumit Tambekar

कुंभोजमधील लॅब टेक्नीशियन पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिह्यात 30 हजार नवमतदार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!