Tarun Bharat

हातकणंगले तालुक्यात परतीच्या पावसाची सरासरी 62. 38 मि. मी.

प्रतिनिधी / हातकणंगले

हातकणंगले तालुक्यामध्ये परतीच्या पावसाची सरासरी 62. 38 मिलिमीटर इतकी झाली आहे. तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने भुईमूग भात व अल्प प्रमाणात सोयाबीन या हाता तोंडाला आलेली पिके सडून गेली आहेत.

हातकणंगले तालुक्यातील 8 सर्कल ठिकाणाहून पावसाची सरासरी काढली जाते यात प्रामुख्याने सर्वाधिक पावसाची नोंद इचलरकंजी परिसरात झाले असून, ही 89 मिलिमीटर इतकी आहे. तर त्या खालोखाल हातकणंगले परिसरात 71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच कबनुरमध्ये 70 मिलिमीटर, हेरले येथे 66 मिलिमीटर , हुपरी येथे 52 मिलिमीटर रूई येथे 57 मिलिमीटर तर वडगाव येथे 48 मिलीमीटर व वाठार येथे 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांना दिले असून त्याची तंतोतंत आकडेवारी लवकरच मिळेल असे ही सांगण्यात आले आहे.

Related Stories

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरील नो एंट्री’चा ताण सीपीआर’ वर..!

Archana Banage

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या बालकाचा मृत्यू

Archana Banage

शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्ह व लेटरहेडचा गैरवापर

Archana Banage

प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा गजबजू लागल्या शाळा

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 325 वर

Archana Banage

केंद्र सरकारची दिडपट हमीभावाची भूलथापच : राजू शेट्टी

Archana Banage