Tarun Bharat

हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी सोनाली पाटील

पुलाची शिरोली / वार्ताहर

हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी तब्बल ‘साठ’ वर्षांनंतर पुलाची शिरोली येथील भारतीय जनता पक्षाच्या सदस्या डॉ. सोनाली सुभाष पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.‌ त्यांना सुचक म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाचे सदस्य डॉ. प्रदिप पाटील व आमदार प्रकाश आवाडे गटाचे सदस्य महेश पाटील यांनी सह्या केल्या आहेत. उपसभापती पदाचा वाद न मिटल्यामुळे हि निवड पुढे ढकलण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजता हातकणंगले पंचायत समिती सभापती निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.‌ या अनुषंगाने रविवारी रात्री कोल्हापूर येथील अयोध्या हॉटेल मध्ये सर्व पक्षीय बैठक पार पडली होती.‌ या बैठकीला माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, शिवसेना जिल्हा उपप्रमुख साताप्पा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सदस्य सुरेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेश पाटील, काँग्रेसचे राजकुमार भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही निवडी बिनविरोध करण्याचे एकमत झाले होते. पण सोमवारी उपसभापती पदाचा वाद मिटला नाही. पण सभापतीपदासाठी सर्व पक्षीय बैठकीत एकमत झाले. त्यामुळे सभापतीपदी पुलाची शिरोली येथील भारतीय जनता पक्षाच्या सदस्या डॉ. सौ. सोनाली पाटील यांची निवड निश्चित झाली.

डॉ. प्रदिप पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उर्वरित तीन महिन्यांसाठी हि निवड झाली आहे. हातकणंगले पंचायत समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. विनय कोरे व माजी आमदार महादेवराव महाडिक व सुरेश हाळवणकर (भाजप गट ) यांच्या गटाची सत्ता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार कोरे गटाचे टोप येथील डॉ. प्रदिप पाटील यांना सभापती पदासाठी संधी देण्यात आली होती. त्यांनी गटातंर्गत ठरलेल्या नियमानुसार राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे सोमवारी विशेष निवड सभा घेण्यात आली.

Related Stories

अतिवृषटी मुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी टीम पाठवण्याचे केंद्राला आवाहन : मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करा

Abhijeet Khandekar

शिवाजी पार्कमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ; बंद 4 फ्लॅट फोडले

Archana Banage

Shivaji University : विद्यापीठ अभ्यास मंडळावर आघाडीची बाजी

Archana Banage

भिमगीतातून डॉ. आंबेडकरांना सलाम

Abhijeet Khandekar

दिव्यांग बांधवांनो, मतदार नोंदणी करा – ‘सक्षम’चे आवाहन

Archana Banage