प्रतिनिधी /कोल्हापूर
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ७१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख जिल्हा मार्ग राज्यमार्ग यांचा समावेश आहे. मुख्यता: पन्हाळा तालुक्यातील कोतोली, नांदगाव, नांदारी रस्त्यासाठी ए.डी.बी निधी मधून ४५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बागणी ते दुधगाव रस्त्यांसाठी ४ कोटी असे एकूण ७१ कोटी १८ लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, शिरदवाड शिवनाकवाडी रस्ता ३ कोटी, रुई फाटा ते रुई तळंदगे रस्ता २ कोटी ५० लाख, वडगाव- लाटवडे रस्ता २ कोटी ५० लाख, रुई फाटा ते रुई रस्ता २ कोटी, विकासवाडी, हलसवडे, सांगवडे,पट्टणकोडोली,इंगळी रस्त्याच्या बाजूने आरसीसी गटार बांधणे ७० लाख,पट्टणकोडोली हुपरी,रेंदाळ,जंगमवाडी रस्त्याच्या बाजूने आरसीसी गटार बांधणे ८० लाख, तळंदगे ते कसबा सांगाव रस्त्यावरती लहान पूल बांधणे ८५ लाख, इंगळी ते दत्तमंदिर रस्त्यावरती लहान पूल बांधणे ६२ लाख, पन्हाळा तालुक्यातील कोतोली ते तिरपण, दिगवडे,पुनाळ,कळे रस्ता ३ कोटी ५० लाख, निगवे कुशिरे पोहाळे, गिरोली,केखले रस्त्यावरती लहान पूल बांधणे ६२ लाख,कोडोली, ऐतवडे रस्त्यावर लहान पूल बांधणे ५९ लाख, केर्ली, वाडीरत्नागिरी, जोतिबा, गिरोली रस्ता ४ कोटी ५० लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मतदारसंघात जास्त निधी
“मतदार संघातील उर्वरित रस्तेही पुरवणी अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करून जास्तीत जास्त निधी भविष्यात आणणार असून हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा विकास करण्यास प्राधान्य देईन.” – धैर्यशील माने, खासदार


previous post
next post