Tarun Bharat

हातखंबा दर्ग्याजवळ चार ट्रकचा अपघात

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा दर्ग्याजवळ चार मालवाहू ट्रक एकमेकांना धडकून अपघात झाल़ा या अपघातात दोन ट्रक रस्त्यावरच उलटले तर दोन ट्रक 50 फूट खोल दरीमध्ये कोसळल़े ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी या अपघातात 6 जण जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांना गंभीर दुखापत झाली आह़े

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू घनश्याम यादव (42, गुजरात) हा आयशर टेम्पो घेऊन गोवा ते मुंबई असा जात होत़ा यावेळी मागून येणाऱया ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने आयशर टेम्पोला मागून धडक दिल़ी या धडकेने यादव याच्या ताब्यातील आयशर समोरील दुसऱया आयशर ट्रकवर जोराने आदळल़ा मागून धडक बसलेले दोन्ही ट्रक हे 50 फूट खोल दरीमध्ये कोसळल़े तर ताबा सुटलेल्या ट्रकने आयशरला धडक देऊन समोरून येणाऱया दुसऱया डंपरला धडक दिली. यामुळे हे दोन्ही ट्रक रस्त्याकडेला उलटल़े अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केल़े तासाभराच्या प्रयत्नानंतर जखमींना बाहेर काढून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल़े

   या अपघातात 6 जण जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांना गंभीर दुखापत झाली आह़े जखमींमध्ये राजू घनःशाम यादव (42, गुजरात), चामिंदरसिंग कलमसिंग बदोरिया (45), दानसिंग संतोष सतदेव (28), रणजितकुमार राजकुमार सनप (27), डपंर चालक प्रकाश गणपत भोसले (45, आंबा कोल्हापूर), रामलाल प्रसाद मिश्रा (47, गुजरात) अशी जखमींची नावे आहेत़ त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े

या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होत़ी अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होत़े गेल्या काही दिवसांपासून हातखंबा गाव दर्ग्याजवळ सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आह़े या महिन्यांतच ही तिसरी मोठी अपघाताची घटना आह़े सातत्याने होणाऱया अपघातामुळे हा भागाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आह़े

Related Stories

अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी एसटी गाडय़ांची सुविधा

NIKHIL_N

देव्हारी नदीवरील पुलाचा भराव पुर्ववत न केल्याने विद्यार्थ्यांचे हाल

tarunbharat

गीतेशच्या मृत्यूची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी-अक्रम खान

Ganeshprasad Gogate

Ratnagiri : जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, सीईओ डॉ.जाखड यांच्या बदल्या

Abhijeet Khandekar

खरीप हंगामासाठी 95 कोटींचे कर्ज वाटप

NIKHIL_N

रत्नागिरी ; फणसू येथे घरासह गोठा कोसळला लाखोंचे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!