Tarun Bharat

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण आणि कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ आणि नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस येत्या 26 ऑक्टोबरला देशव्यापी आंदोलन करणार आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भात सर्व राज्य युनिट्सना पत्र लिहिले आहे. दरम्यान, 25 ऑक्टोबरला काँग्रेस देशभरात ‘महिला आणि दलित छळ दिन’ साजरा करणार आहे. 

हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याने काँग्रेस आक्रमक झाले आहे. पीडित कुटुंबाचा मोदी सरकारकडून आवाज दाबला जात आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. हाथरस प्रकरण आणि नवीन कृषी कायद्यांविरोधात 31ऑक्टोबरला राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयासमोरही निदर्शने करण्यात येणार आहेत.  

याशिवाय शेतकरी स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत 7 नोव्हेंबरपर्यंत दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. काँग्रेस 14 नोव्हेंबरला या सर्व सह्यासह नव्या कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रपतींना निवेदन सादर करणार आहे. 

Related Stories

विधानभवनासमोर उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage

ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजप अपक्षांना भीती दाखवतंय- संजय राऊतांचा गंभीर आरोप

Archana Banage

आप ही आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी : चन्नी

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात कोरोनाचा पहिला बळी; इचलकरंजीच्या वृद्धाचा मृत्यू

Archana Banage

पूर्वा गावडेला महाराष्ट्र ऑलम्पिक जलतरण स्पर्धेत दोन गोल्ड,दोन ब्रॉंझ मेडल

Anuja Kudatarkar

भारतात तयार होणार इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी

datta jadhav