Tarun Bharat

हाफ हिल मॅरेथॉनमध्ये जल्लोषात धावले सातारकर

महिलांमध्ये मनिषा जोशी प्रथम, पुरूषांमध्ये बाळू पुकळे यांनी मारली बाजी

प्रतिनिधी / सातारा :

निसर्ग संपन्न अशा सातारा शहरात कोरोनाच्या संकटानंतर सातारकर मनमुरादपणे जल्लोषी वातावरणात सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये धावले. खा. श्री. छ. उदयनराजेंच्या हस्ते स्पर्धेचा सकाळी फ्लॅग ऑफ करत मोठय़ा धुमधडाक्यात धावपट्टूंनी पळायला सुरुवात केली. हवेतला गारवा अन् देशभक्तीपर गीताची धुन, रस्त्या रस्त्यात चीअरअप करायला उभे असलेले सातारकर यामुळे धावपट्टूंना धावण्यांसाठी एक वेगळाच उत्साह संचारला होता.

कोरोनाच्या संकटानंतर सातारकरांची असलेली सातारा हाफ हिल मॅरेथॉन आयोजकांनी सर्व नियम पाळून घेतली होती. पोलीस कवायत मैदानावर सकाळी खा. उदयनराजे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेला सुरुवात झाली. धावपट्टू धावू लागले. धावपट्टूंचे चौकाचौकात स्वागत करण्यात येत होते. त्यामध्ये पोवई नाका, शाहु चौक, समर्थ मंदिर, बोगदा आदी ठिकाणी आयोजकांच्यावतीने व सातारकरांनी धावपट्टूंना टाळय़ा वाजवून प्रोत्साहित करण्यात येत होते. ही स्पर्धा पावणे दहा वाजता संपली.

महिलांमध्ये मनिषा जोशी यांनी अवघ्या 1 तास 46 मिनिट 35 सेकंदात अंतर पार करून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर पुरूषांमध्ये बाळू पुकळे यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यांनी 1 तास 14 मिनिट 13 सेकंदात अंतर पार केले अन् गोल्ड मेडल पटकावले.

Related Stories

निवडणुकीमुळे लोणंदच्या ढाब्यांवर तळीरामांचा अड्डा

Patil_p

मंत्री आदित्य ठाकरे साताऱयाच्या शिवसैनिकांना भेटूनच परतले

Patil_p

दीपाली चव्हाण प्रकरणी वनसंरक्षक रेड्डीला अटक

Amit Kulkarni

मे महिन्यात कोरोनाने जिह्याचे कंबरडे मोडले

Patil_p

‘तरुण भारत’पुढे लॉकडाऊनचे लोटांगण

datta jadhav

सातारा झेडपीत गतवर्षीची कामे बाजूला करण्यात कर्मचारी दंग

datta jadhav