Tarun Bharat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होणार ‘हायटेक’

स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार

वृत्तसंस्था/ कानपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत लवकरच हायटेक होणार आहेत. भाजपच्या धर्तीवर संघात स्वतःचा आयटी विभाग तयार करण्यावर काम सुरू असल्याचे समजते. याच्या अंतर्गत प्रत्येक स्वयंसेवक सोशल मीडियाशी जोडला जाईल आणि अत्यंत दमदारपणे स्वतःचे म्हणणे मांडू शकणार आहे. सर्वसाधारणपणे संघ आणि स्वयंसेवक प्रसिद्धीमाध्यमांपासून अंतर राखून असतात. पण काही महिन्यांमध्येच संघटनेत मोठा बदल दिसून येणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये शाखा किंवा सेवाकार्यांद्वोरच स्वतःचे विचार मांडू शकतो. याच्याव्यतिरिक्त अन्य कुठलेच साधन नाही, पण आता सोशल मीडियाशी जोडले गेल्यावर सहजपणे स्वतःची भूमिका मांडता येणार आहे. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सोशल मीडियाशी जोडले गेले असले तरीही ते फारसे सक्रीय नाहीत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयटी विभाग स्थापन करून संवादाचे मोठे माध्यम निर्माण करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावर स्वतःचे म्हणणे कसे मांडावे, याचबरोबर स्वतःच्या विचारांना कशाप्रकारे लोकांना समाधानकारक पद्धतीने समजवावे, उदाहरणांसह लोकांच्या मनातील गोंधळ कशाप्रकारे दूर केला जाऊ शकतो याचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात येणार आहे.

डिजिटल स्वयंसेवक

याचबरोबर संघ मोठय़ा संख्येत डिजिटल वॉलेंटियर्स तयार करणार आहे. हे डिजिटल वॉलेंटिसर्य संघाच्या विचारांची धुरा सांभाळतील. डिजिटल झाल्यावर शाखा स्तरावरील स्वयंसेवक व्हर्च्युअल मीटिंगने जोडले जातील. याचबरोबर माहितींचे आदान-प्रदान करण्यासह त्यांच्या समस्या दूर केल्या जातील.

Related Stories

राज्यसभा पोटनिवडणूक : भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Archana Banage

धर्मांतरणाच्या नेटवर्कचा 7 राज्यांमध्ये फैलाव

Patil_p

गर्दीअभावी ट्रम्प यांची दुसरी सभा रद्द

datta jadhav

पत्रकार रोहित सरदाना यांचे हार्ट ऍटॅकने निधन

Patil_p

घरी परतणाऱ्या मजुरांना काँग्रेसकडून मदतीचा ‘हात’

Tousif Mujawar

चार महत्वाच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक

Patil_p