Tarun Bharat

‘हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन’च्या चाचण्यांना WHO चा ब्रेक

ऑनलाईन टीम / बर्लिन : 

कोरोनावर प्रभावी ठरलेल्या ‘हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन’ या औषधाच्या चाचण्या जागतिक आरोग्य संघटनेने थांबवल्या आहेत.

रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन या औषधाचा वापर करण्यात येत होता. मात्र, या ओैषधाच्या परिणामकारकतेबद्दल ज्या चाचण्या करण्यात आल्या त्यातून कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी या औषधाचा फार कमी प्रमाणात उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले. 

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यामध्ये उपयुक्त ठरलेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संचालन समितीच्या शिफारशीवरुन या औषधाच्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन बरोबरच लोपिनवीर/ रटनवीर या औषधाच्या चाचण्यांनाही ब्रेक लावण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

Related Stories

बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 2.50 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

साताऱ्यात भरदिवसा गोळीबार, एकजण ठार

Archana Banage

अमेरिकेकडून भारताला 5.9 मिलियन डॉलरची मदत

prashant_c

पीओकेत दहशतवाद्यांचे 9 लाँचिंग पॅड

Patil_p

दिल्लीत एका दिवसात 4,473 नवे कोरोना रुग्ण, 33 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

महिलांची स्पेशल बस टॉप गिअरवर; 15 दिवसांत 5500 महिलांनी घेतला लाभ

Abhijeet Khandekar