Tarun Bharat

हायमास्ट पथदिव्यांसाठी विजपुरवठा करा, अन्यथा उपोषण : जि.प.सदस्या मनिषा कुरणे

वार्ताहर / शिये

शिये जिल्हा परिषद मतदार संघात उभारण्यात आलेल्या हायमास्ट पथदिव्यांसाठी महावितरणने वीज पुरवठा न केल्याने दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महावितरण त्वरित विज न जोडल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांनी आपल्या फंडातून दलित वस्ती सुधार योजनेतून शियेत ३ , सादळे – मादळेत २, भुये व निगवे दुमाला येथे प्रत्येकी १ असे ७ हायमास्ट पथदिवे उभे केले आहेत. पथदिवा उभारणीसाठी प्रत्येकी सव्वालाख प्रमाणे १० लाख रुपये खर्च आला आहे. काम पुर्ण होऊन दोन महिने झाले. कुरणे यांनी वीज जोडणीबाबत महावितरण कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे.

तरीही ग्रामपंचायतीचे वीजबिल थकीत असल्याचे कारण पुढे करत महावितरणने वीज जोडणीसाठी नकार दिला असल्याचे कुरणे यांनी सांगितले. त्यामुळे सात दिवसांत वीज जोडणी न केल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे व ग्रामपंचायत सदस्य सतीश कुरणे यांनी दिला आहे.

Related Stories

राष्ट्रपती राजवटीची सर्व कारणे राज्य सरकारने पुर्ण केली – चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

आयात उमेदवारामुळे भाजपमध्ये खदखद

Archana Banage

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Archana Banage

शैलेश बलकवडे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक

Archana Banage

आदर्श हायस्कूल भामटेच्या मच्छिंद्र कुंभार यांना २०२० चा ग्लोबल टिचर पुरस्कार

Archana Banage

कोल्हापूर : शिरोळ नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांचा राजीनामा

Archana Banage