Tarun Bharat

हाय व्होल्टेजमुळे काळोशीत 35 टिव्ही जळाले

वार्ताहर / परळी : 

तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे शनिवारी सायंकाळी अचानक हायव्होलटेज झाल्याने जवळपास 35 टिव्ही, काही फ्रीज आणि लाईटचे मीटरही जळाले. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असून, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.   

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून स्थानिक नागरिक महावितरणकडे व्होलटेज कमी जास्त होत असल्याची तक्रार देत आहेत. तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असून, कोरोनासारख्या महामारीत लोकांना मोठा फटका बसला आहे. ही चूक महावितरणची असल्याने संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

Related Stories

सातारा : वाईत मटका अड्ड्यावर छापा

datta jadhav

झेडपीच्या स्वच्छतेचे टेंडर लाखो रुपयांचे तशी स्वच्छता होतेय का?

Amit Kulkarni

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – आ. शिवेंद्रसिंहराजे

Archana Banage

राजधानीसह जिह्यात दिवाळीला उत्साहात झाला प्रारंभ

Patil_p

सातारा जिल्ह्यात कोरोना स्थिती गंभीर : सोमवारी १७० बाधित, ४ बळी

Archana Banage

परदेशातून आलेले 40 जण गृहविलीगीकरणात

Patil_p