Tarun Bharat

हार्दिक पंडय़ाचा अर्धशतकी झंझावात

इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना

वृत्तसंस्था /साऊदम्प्टन

हार्दिक पंडय़ाची अवघ्या 33 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारांसह 51 धावांची आतषबाजी आणि त्याला सूर्यकुमार (19 चेंडूत 39), दीपक हुडा (17 चेंडूत 33) यांच्या समयोचित साथीच्या बळावर भारताने यजमान इंग्लंडसमोर पहिल्या टी-20 सामन्यात 8 बाद 198 धावांचा डोंगर रचला.

पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या हार्दिक पंडय़ाने आपल्या 33 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार व 1 उत्तुंग षटकार फटकावत टी-20 मधील पहिले अर्धशतक नोंदवले.

याशिवाय, सूर्यकुमार व दीपक हुडा यांनीही उत्तम फटकेबाजी केली. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डन व मोईन अली यांनी प्रत्येकी 2 तर टॉपली, मिल्स व मॅट पार्किन्सन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव ः 20 षटकात 8 बाद 198 (हार्दिक पंडय़ा 33 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 51, सूर्यकुमार यादव 19 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 39, दीपक हुडा 17 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 33, रोहित शर्मा 14 चेंडूत 5 चौकारांसह 24, अक्षर पटेल 17, दिनेश कार्तिक 11. अवांतर 9. ख्रिस जॉर्डन 4 षटकात 2-23, मोईन अली 2-26, टॉपली, तिमल मिल्स, मॅट पार्किन्सन प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

झिंबाब्वेच्या पहिल्या डावात 406 धावा

Patil_p

मनिका बात्रा पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

ओडिशा सरकारकडून हॉकीपटूंचा गौरव

Patil_p

पिछाडीवरून एफसी गोवाची नॉर्थईस्ट युनायटेडशी बरोबरी

Patil_p

माजी मुष्टियुद्ध प्रशिक्षक संधू द्रोणाचार्य पुरस्कार परत करण्याच्या तयारीत

Patil_p

भारतीय मुष्टियोद्धय़ांसाठी यंदा भरगच्च हंगाम

Omkar B
error: Content is protected !!