Tarun Bharat

हार्दिक पंडय़ाने स्पर्धेत गोलंदाजी का केली नाही?

मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मागील काही आठवडे सातत्याने वर्चस्व गाजवले असले तरी यात विशेषतः मुंबईच्या चाहत्यांना एक प्रश्न सातत्याने सतावत होता की, हार्दिक पंडय़ाला गोलंदाजी का सोपवली जात नाही? आणि अखेर ही स्पर्धा संपल्यानंतर त्याचा उलगडा झाला, त्यानुसार खबरदारी म्हणून त्याच्याकडून मुंबई प्रँचायझीने गोलंदाजी करवून घेतली नाही.

हार्दिक पंडय़ा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतीय संघात समाविष्ट आहे. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडय़ापासून ही मालिका खेळवली जाणार आहे. गतवर्षी इंग्लंडमध्ये त्याच्यावर पाठीची शस्त्रक्रिया झाली होती. 2018 मधील इंग्लंड दौऱयादरम्यान त्याला पाठीचा त्रास सुरु झाला होता.

प्रत्यक्ष शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पंडय़ा जवळपास वर्षभर मैदानापासून दूर राहिला. त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 लढतीच्या माध्यमातून त्याने पुनरागमन केले. पुढे, बांगलादेश व विंडीजविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. शिवाय, श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका, तसेच या वर्षाच्या प्रारंभी संपन्न झालेल्या पूर्ण न्यूझीलंड दौऱयात तो सहभागी होऊ शकला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर, मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने पंडय़ावर अधिक भार पडू नये, यासाठी त्याच्याकडून गोलंदाजी करवून घेतली नाही व स्पेशालिस्ट फलंदाज म्हणूनच त्याच्याकडे पाहिले. यामुळे, चाहत्यांना पंडय़ाची गोलंदाजी आयपीएलच्या 13 व्या हंगामात पाहता आली नाही.

Related Stories

निवृत्त झालेलो नाही, मायदेशातच कारकिर्दीचा समारोप करेन!

Patil_p

स्वायटेककडून अँड्रेस्क्यू पराभूत

Patil_p

सूर्यकुमारची एकाकी झुंज निष्फळ

Patil_p

मिताली राज मानांकनात पुन्हा अग्रस्थानी

Patil_p

केरळ ब्लास्टर्सच्या खेळाडूंना नवीन जर्सी

Patil_p

डेन्मार्क, बेल्जियमची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p