वृत्तसंस्था / मुंबई :
भारतीय संघातील अष्टपैलू हार्दिक पांडय़ाने क्रिकेट सरावा येथे प्रारंभ केला आहे. दुखापतीमुळे मध्यंतरी पांडय़ाला क्रिकेटमधून अलिप्त रहावे लागले होते. त्याची ही दुखापत बरी होण्याच्या मार्गावर आहे.
सोमवारी येथील वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाचा सराव सुरू असताना हार्दिक पांडय़ाने गोलंदाजीचा सराव केला. पांडय़ाची ही दुखापत यापूर्वी पूर्ण बरी झाली नसल्याने त्याला न्यूझीलंड दौऱयासाठी भारत अ संघातून वगळण्यात आले होते. बऱयाच कालावधीनंतर हार्दिक पांडय़ा गोलंदाजीचा सराव करताना पहावयास मिळाला. या सरावात कर्णधार कोहली तसेच बुमराह यांनी आपला सहभाग दर्शविला होता. ऑस्ट्रेलिया बरोबर पहिला वनडे सामना येथील वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी खेळविला जाणार आहे. सराव सत्रामध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडू सहभागी झाले होते