Tarun Bharat

…हा तर लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई :


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे.


ते म्हणाले, उत्तर प्रदेशचे पोलीस ज्या प्रकारे राहुल गांधींसोबत वागले, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारे नसून, हा तर या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे, असे म्हणत आपला संताप व्यक्त केला.


पुढे ते म्हणाले, राहुल गांधी खासदार आहेत…सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसेच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिले आहे. रक्त सांडले आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  

Related Stories

shivsenadasaramelava-शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत? परवानगीच्या पत्राला BMC कडून उत्तर नाही

Rahul Gadkar

राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही; भाजपने स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस करु नये- उद्धव ठाकरे

Archana Banage

मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एल. एन. मूर्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Tousif Mujawar

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या : प्रवीण तोगाडिया

prashant_c

राज्याला वादळी पावसाचा इशारा

datta jadhav

प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

datta jadhav