Tarun Bharat

हा तव भर्ता मन्मथ जाणें

Advertisements

माशाच्या पोटातील ते बालक पाहून स्वयंपाकी आश्चर्यचकित झाला. त्याने ते बालक मायावतीच्या स्वाधीन केले. ही मायावती कोण?

मन्मथयुवति जे कां रति । शंबरालयीं ते मायावती। कमनीय बाळक देखोनि चित्तीं । परम विश्रान्ति पावली । कामदेव मन्मथाची पत्नी रति ही मायावतीच्या रुपाने शंबरासूराच्या महाली दासी म्हणून राहत होती. ते सुंदर बालक पाहून तिच्या मनाला अत्यंत शांतीचा लाभ झाला.

पुढती शंका मानी मनीं । नरवैडूर्य मत्स्ययोनीं।  हे दैत्याची कापटय़करणी। किंवा मोहिनी देवमाया। ऐसी साशंक हृदयकमळीं । कमनेय बाळक जंव निहाळी । सांगो इच्छी शंबराजवळी । तंव आला जवळी देवर्षि ।

त्याचवेळी तिच्या मनात शंका आली की हे मानवी बालक माशाच्या उदरात आले ही कुणा दैत्याची कपट करणी आहे की कुणा देवाची माया आहे? या शंकेमुळे हे सुंदर बालक ती पुनः पुन्हा न्याहाळू लागली. या बालकाबद्दल शंबरासूराला सांगावे असेही तिला वाटले. त्याचवेळी देवषी नारद तिथे आले.

अवो सुंदर कामाङ्गने । हा तव भर्ता मन्मथ जाणें।  मत्स्योदरिं कवण्या गुणें । याचें येणें तें ऐक ।

पूर्वीं वासुदेवांश हा स्मर । तो येथ वासुदेववीर्यें कुमर ।

रुक्मिणीजठरिं हा अवतार । हरी शंबर गतवैरें ।

बाळक टाकितां सिंधुजळीं । दैवयोगें त्या मत्स्य गिळी।

तो मत्स्य खंडितां पाकस्थळीं । तुज हे नव्हाळी पावली।

आतां गुह्य हें प्रकट न करिं । बाळकाचें गोपन करिं ।

जाणोनि निज कान्त निर्धारिं । जन्मान्तरिं उपलब्ध ।

नारद रतिला म्हणाले-हे रति! तुझ्या मनात हे बालक कोण असा प्रश्न निर्माण झाला असेल तर ऐक. हा तुझा पती कामदेवच आहे. हा माशाच्या पोटात कसा आला? श्रीकृष्ण वीर्यापासून रुक्मिणीच्या उदरात कामदेव प्रकट झाला. त्याने जन्म घेताच त्याचा गतजन्मातील शत्रू शंबरासूराने ते बालक पळवले व समुद्रात फेकले. ते एका मोठय़ा माशाने गिळले. तो मासा स्वयंपाक्मयाने चिरला तेव्हा हे बालक त्याने पाहिले व तुझ्या हवाली केले. आता हे गुह्य प्रकट करू नकोस. या बालकाचा सांभाळ कर. हा तुझा जन्मोजन्मीचा पती आहे हे जाण.

मत्स्योदरिं जो लब्ध शिशु । जाणूनि स्वभर्ता वासुदेवांशु । ा त्याच्या ठायीं स्नेहविशेष । धरी विश्वास मुनिवचनीं । मायावती ते मायाप्रचुरा । जिणें मोहिलें शंबरासुरा ।  तिणें सदासदासीनिकरा। मोहूनि लेंकुरा लपविलें । नित्य वाढवी सप्रेमभावें । परंतु कोण्हासि नोहे ठावें । कोणें कोणापें चावळावें। मायालाघवें हें गमे ।

मायावतीने नारदांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. हे बालक हा वासुदेवाचा अंश असलेला आपला पतीच आहे हे तिने जाणले. त्यामुळे त्या बालकाबद्दल तिच्या मनात विशेष प्रेम उत्पन्न झाले. प्रत्यक्ष कामदेवाची पत्नी असलेल्या रतिला म्हणजेच मायावतीला मोहिनी विद्या चांगलीच अवगत होती.

Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

महाविकास आघाडी विरूध्द महायुती

Patil_p

फळे व भाजीपाला वर्ष-2021

Patil_p

फ्लिपकार्टची बिर्लात हिस्सेदारी

Patil_p

पंडितांनी खोरे सोडावे?

Patil_p

पुणेकरांची थट्टा-‘मास्क’री

Patil_p

प्राणिक हीलिंग आणि व्यवसाय

Patil_p
error: Content is protected !!