Tarun Bharat

हा निर्णय अन्यायकारक; मोदी सरकारवर कंगनाची नाराजी

Advertisements

मुंबई प्रतिनिधी

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत येत असते. सध्या तिने मोदी सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून कंगना रणौतने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन, असे कंगनाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांना पटवून देऊ शकलो नाही, आमची तपश्चर्या कमी होती, त्यामुळे आम्हाला हा कायदा मागे घ्यावा लागला आहे.सरकार सर्व प्रयत्न करूनही शेतकऱ्यांच्या एका भागाला तीन नवीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगण्यात अपयशी ठरले आहे.

कंगनाने याआधी सरकारच्या कायदे आणण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. अनेकदा शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या दिलजीत दोसांझसारख्या इतर सेलिब्रिटींवर कंगनाने जोरदार टीका केली होती.

 

Related Stories

कोरोना काळात मुकेश अंबानींचा मदतीचा हात ; ऑईल फॅक्टरीत ऑक्सिजन निर्मिती, मोफत पुरवठा

Archana Banage

तामिळनाडू राज्यातही 31 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी

Patil_p

शेतकरी हिताचे कृषी सुधारणा विधेयक लवकरच

Archana Banage

शेतकरी आंदोलक आज ‘जंतर-मंतर’वर

Patil_p

मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? ; राज ठाकरेंचे भन्नाट उत्तर

Archana Banage

राखीला हवी आहे किडनी…

Patil_p
error: Content is protected !!